'त्या' महाविद्यालयाने पुन्हा विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखले

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालू नका,याविषयी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी संवाद साधूनही मुजोर महाविद्यालय ऐकत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जातात आहे.

'त्या' महाविद्यालयाने पुन्हा विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखले

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न असणाऱ्या विधी अभ्यासक्रमाच्या एका नामांकित महाविद्यालयाने (a reputed law college ) ५५  टक्के हजेरी भरत नसल्याचे कारण समोर करून काही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखण्याचा निर्णय ( Decision to prevent appearing for examination) घेतला आहे. महाविद्यालय व विद्यापीठाकडे विनंती करूनही त्यातून मार्ग निघत नसल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत.तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालू नका,याविषयी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी संवाद साधूनही मुजोर महाविद्यालय ऐकत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जातात आहे.

विद्यापीठ नियमानुसार विद्यार्थ्यांची ५५ टक्के हजेरी असणे आवश्यक आहे. मात्र, हजेरी कमी असल्यास त्यावर महाविद्यालय स्तरावर निर्णय घेता येऊ शकतो. विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या एकाही महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या हजेरीच्या कारणावरून त्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखले जात नाही. केवळ याच एका महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना वारंवार परीक्षा देण्यापासून रोखले जाते.

शिक्षक बिघडण्याच्या मार्गावर, मोदीजी कामाला लावणार! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

संबंधित महाविद्यालयाने काही विद्यार्थ्यांना हजेरी कमी असताना देखील परीक्षेची संधी दिली आहे.मात्र केवळ तीन विद्यार्थ्यांना ही संधी नाकारली आहे. नियमावर बोट धरून चालणाऱ्या याच महाविद्यालयाने काही दिवसांपूर्वी विधी अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर करण्यास ९० दिवसांचा कालावधी लावला होता. प्रत्यक्षात ४५ दिवसात परीक्षेचा निकाल जाहीर करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयातील प्राध्यापकांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने करणे दाखवा नोटीसही बजावली होती.परंतु, विद्यापीठाने अद्याप संबंधित प्राध्यापकांवर कोणतीही कारवाई केली नाही. आता त्याच महाविद्यालयाकडून विद्यापीठाला व विद्यार्थ्यांना नियम शिकवले जात आहेत.

परीक्षेपासून रोखण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची हजेरी ५३ व ५४ टक्के एवढी आहे. १ व २ टक्के हजेरी कमी असल्याने महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांवर ही कार्यवाही केली जात आहे. येत्या सोमवारपासून या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी सर्व शुल्क भरले आहे.तसेच परीक्षा अर्ज भरला असून या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे हॉल तिकीटही आले आहे. मात्र,महाविद्यालयाने या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही,असे सांगितले आहे.वर्ष वाया जाऊ नये म्हणून विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी यातून मार्ग काढावा यासाठी विद्यार्थी विनंती करत आहे. परंतु,महाविद्यालय त्यांना दाद देत नाही.त्यामुळे या आडेल महाविद्यालयासंदर्भात विद्यापीठ काय निर्णय घेणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j