नगरपरिषदेच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर; तब्बल सव्वा दोन लाख अर्ज

नगरपरिषदेच्या विविध पदांसाठी टीसीएस-आयओएन कंपनीकडून परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.

नगरपरिषदेच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर; तब्बल सव्वा दोन लाख अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नगरपरिषद प्रशासन संचालनालयाअंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून दि. २५ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू होणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल सव्वा दोन लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. (Municipal Council Recruitment)

 

नगरपरिषदेच्या विविध पदांसाठी टीसीएस-आयओएन कंपनीकडून परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. दि. ३ नोव्हेंबरपर्यंत परीक्षा सुरू राहणार असून प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या तीन सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदासाठी सर्वाधिक १ लाख ४७ हजार अर्ज आले असून या पदाच्या परीक्षा २५ ते २७ ऑक्टोबर अशा सलग तीन दिवस घेतल्या जाणार आहेत.

शिक्षक भरती प्रक्रियेला वेग; लवकरच जाहिराती निघणार, आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

 

स्थापत्य अभियांत्रिकी पदासाठी ३३ हजार ४८४ अर्ज प्राप्त झाले असून ही परीक्षा २७ ऑक्टोबर व २ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. स्वच्छता निरीक्षक सेवा पदाची परीक्षा दि. २८ ऑक्टोबर रोजी घेतली जाईल. या पदासाठी सुमारे अडीच हजार अर्ज आले आहेत. याच दिवशी अग्निशमन सेवा व संगणक अभियांत्रिकी सेवा पदासाठी परीक्षा होईल. दोन्ही पदांसाठी अनुक्रमे ६५१ व ४ हजार ६०० अर्ज प्राप्त झाले आहेत.

 

दि. २९ ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता आणि विद्युत अभियांत्रिकी पदांसाठी परीक्षा होईल. या पदांसाठी अनुक्रमे ४ हजार ६४० व ६ हजार ६२० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. लेखापरिक्षण व लेखा सेवा पदाची परीक्षा दि. ३ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार असून त्यासाठी २५ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. असे एकूण २ लाख २४ हजार ७७४ उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केले आहेत.

 

उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्राचे शहराचे नाव किमान पाच ते सहा दिवस आधी उपलब्ध करून दिले जाईल. परिक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना परिक्षेपुर्वी तीन दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती उमेदवारांचा मोबाईल, ई-मेल व लॉगइन आयडीवर उपलब्ध करून दिली जाईल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k