शाळांवर मोठी जबाबदारी; इयत्ता नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांची मतदार यादीत होणार नोंदणी

दि. १ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण करणे नवमतदारांची नोंदणी करून मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शाळांवर मोठी जबाबदारी; इयत्ता नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांची मतदार यादीत होणार नोंदणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

राज्यातील सर्व शाळांमधील (Schools in Maharashtra) इयत्ता नववी ते बारावीपर्यंत्या पात्र विद्यार्थ्यांची मतदार यादीत (Voter List) नोंदणी करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) सर्व शाळांना सुचना दिल्या असून त्याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळांवर सोपविण्यात आली आहे. (Maharashtra Government)

 

भारतीय निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत दि. १ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण करणे नवमतदारांची नोंदणी करून मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याचा उपक्रम राबविण्याची विनंती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आहे.

शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द होण्याची प्रक्रिया माहिती आहे का? शिक्षणाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी

 

त्यानुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळेतील इयता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना निवडणूक साक्षरता मंडळामार्फत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ या कार्यक्रमाची माहिती देण्यात यावी, निवडणूक साक्षरता मंडळामार्फत दिनांक १७.१०.२०२३ ते दिनांक ३०.११.२०२३ या कालावधीत, दिनांक ०१.०१.२०२४ रोजी १८ वर्ष वय पूर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी अर्ज भरुन घेण्यात यावेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे दिनांक ०१.१०,२०२४ पर्यंत १८ वर्ष वय पूर्ण होणार आहे. अशा विद्यार्थ्यांकडून ही नविन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज भरुन घेण्यात यावेत, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

 

ऑनलाईन माध्यमामार्फत नविन मतदार नोंदणीबाबत विविध उपक्रम राबविण्यात यावेत. निवडणूक साक्षरता बूट कॅम्प, विविध ऑनलाईन स्पर्धा असे विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात यावी. शाळेमध्ये नविन मतदार नोंदणीबाबत ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करून जनजागृती करण्यात यावी, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

 

शाळेने संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय/ तहसील कार्यालयाकडून आवश्यक अर्जाच्या फॉर्मचे नमुने उपलब्ध करुन घ्यावेत. विद्यार्थ्यांना विहित नाव नोंदणी अर्ज शाळेमध्ये उपलब्ध करून द्यावेत. विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या नाव नोंदणीच्या अर्जांचे संकलन करून शाळेने संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, अशा सुचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

 

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k