राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर ; विनायक पाटील, पूजा वंजारी राज्यात प्रथम

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर ; विनायक पाटील, पूजा वंजारी राज्यात प्रथम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची (State Service Main Exam 2022) अंतिम गुणवत्ता यादी जाहीर (Final merit list announced) करण्यात आली असून विनायक पाटील याने मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर पूजा वंजारी हिने मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला (Vinayak Patil Pooja Vanjari first in the state) आहे. आयोगातर्फे गुरुवारी (दि.18 ) उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्याच दिवशी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.त्यामुळे विद्यार्थ्यांना सुखद धक्का बसला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 613 पदांसाठी सर्वात मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 बाबत अनेक उमेदवारांना उत्सुकता होती. आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि लांबत जाणारे निकाल यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. आयोगातर्फे 18 जानेवारी रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्याच दिवशी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये विनायक नंदकुमार पाटील यांनी 622 गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे . धनंजय बांगर यांनी 608  गुण तर सौरभ गावंडे यांनी 606 गुण मिळवले आहेत.

--------------------