सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'दिवाळी उत्सव २०२३' साजरा

कार्यक्रमात विविध देशातून आलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय नृत्याचे सादरीकरण केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी त्यांचे भाषेतील गाणेही सादर केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'दिवाळी उत्सव २०२३' साजरा
SPPU News

 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) इंटरनॅशनल सेंटरमध्ये (International Centre) दिवाळी निमित्त नुकतेच 'दिवाळी उत्सव २०२३' चे (Diwali Festival) आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठात विविध देशातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी उत्स्फुर्तपणे सहभाग घेत  दिवाळीचा आनंद लुटला.

 

इंटरनॅशनल सेंटरच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी उपस्थित होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, इंटरनॅशनल सेंटरचे संचालक आणि प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, डॉ. देविदास वायदंडे, सागर वैद्य, सिनेट सदस्य प्रसेनजीत फडणवीस, ‘पुंबा’च्या समन्वयक डॉ. शिल्पा भिडे, अनुराधा चौधरी आदी उपस्थित होत्या.

आविष्कार विभागीय स्पर्धेचा निकाल जाहीर; विद्यापीठस्तर स्पर्धेसाठी २७३ विद्यार्थ्यांची निवड

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध देशातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक आवड विद्यापीठ जोपासत असते आणि त्यासाठीच इंटरनॅशनल सेंटर दरवर्षी विविध सणांनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी यावेळी दिली.

 

कार्यक्रमात विविध देशातून आलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय नृत्याचे सादरीकरण केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी त्यांचे भाषेतील गाणेही सादर केले. यावेळी विविध देशाच्या समन्वयकांचा सत्कार कुलगुरू यांच्या हस्ते करण्यात आला. या क्रार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी फटाके फोडून या कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती कोकीळ यांनी केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO