भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'संविधान सन्मान दौड'चे आयोजन

संविधान दौडचे हे दुसरे वर्षे आहे. मागील वर्षी या स्पर्धेत ५० देशांचे दोन हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यावर्षी ६ ते ७ हजार स्पर्धक सहभागी होतील, असा अंदाज आहे.

भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'संविधान सन्मान दौड'चे आयोजन
Constitution Honour Run

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

भारतीय संविधान दिन (Constitution Day) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'संविधान सन्मान दौड २०२३' चे (Constitution Honour Run) आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (Barti), डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

 

महोत्सव समिती पुणेचे अध्यक्ष व 'संविधान सन्मान दौड' चे मुख्य आयोजक परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी दीपक म्हस्के, तानाजी तापकिरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (BARTI) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

MPSC Exam : स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर; नागरी सेवा पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये

 

संविधान दौडचे हे दुसरे वर्षे आहे. मागील वर्षी या स्पर्धेत ५० देशांचे दोन हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यावर्षी ६ ते ७ हजार स्पर्धक सहभागी होतील, असा अंदाज आहे. यंदाची स्पर्धा २६ नोव्हेंबर रोजी पहाटे साडे पाच  वाजता खाशाबा जाधव क्रीडा संकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून सुरू होणार आहे.  संविधान सन्मान दौड ही १६ वर्षांखालील, १८ वर्षांखालील आणि खुल्या वयोगटात अशा तीन विभागात घेतली जाणार आहे. ती प्रामुख्याने ३  किलोमीटर, ५ किलोमीटर आणि 10 किलोमीटर अंतराची असणार आहे. याप्रमाणेच  दिव्यांगांसाठीही दिव्यांग व्हीलचेयर रेस (अॅटोमॅटीक) आणि दिव्यांग व्हीलचेयर रेस (मॅन्यूअल) अशा दोन प्रकारात स्पर्धा घेतली जाणार असून ही दौड २ किलो मीटर अंतराची असणार आहे. 

 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून नावनोंदणी  बंधनकारक आहे. दि. २२ नोव्हेंबर ही नावनोंदणीची शेवटची तारीख आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकास एक टी-शर्ट ,सर्टिफिकेट, मेडल, संविधानाची प्रत, नाष्ट्याचे  किट, मेडिकल सुविधा देण्यात येणार आहेत, तसेच सर्व वयोगटातील  पुरुष आणि महिला गटात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृती चिन्ह दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी 9822483714/  9373887112/ 9850111710 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन परशुराम वाडेकर यांनी केले.

 

संविधान सन्मान दौड चा मार्ग हा  खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथून सुरू होईल आयूका गेट, डॉ. आंबेडकर चौक, औंध रोड बोपोडी, भाऊ पाटील रोड, शाहू चौक येथून यु टर्न पुढे आई आप्पा मंदिर,  विद्यापीठ मेन गेट, विद्यापीठ मेन  बिल्डिंग आणि समारोप खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे होणार असल्याचेही वाडेकर यांनी सांगितले.

संविधान दिनी सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी

नवीन संसद भवन इमारतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान असे नाव दिले आहे. देशभरात भारतीय संविधान दिन २६ नोव्हेबर रोजी मोठ्या उत्साहात, विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यामुळे स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनी जशी देशात सार्वजनिक सुटी आहे, त्याच धर्तीवर संविधान दिन साजरा करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशभर सार्वजनिक सुटी जाहिर करावी, अशी मागणी परशूराम वाडेकर यांनी केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO