आविष्कार विभागीय स्पर्धेचा निकाल जाहीर; विद्यापीठस्तर स्पर्धेसाठी २७३ विद्यार्थ्यांची निवड

विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा विद्यापीठात होणार आहे. स्पर्धेसाठी निवडलेल्या सहा विद्याशाखांच्या युजी, पीजी आणि पीपीजी च्या प्रत्येक प्रकल्पासाठी फक्त एक संशोधनक विद्यार्थ्यांना आपले संशोधन प्रकल्प सादर करता येणार आहेत.

आविष्कार विभागीय स्पर्धेचा निकाल जाहीर; विद्यापीठस्तर स्पर्धेसाठी २७३ विद्यार्थ्यांची निवड

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत (SPPU) विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या आविष्कार संशोधन स्पर्धेचा (Avishkar Research Competition) निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार २७३ विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांची विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सर्वाधिक ५५ प्रकल्प विज्ञान विद्याशाखेतील आहेत. विद्यापीठस्तर स्पर्धेचे वेळापत्रक दिवाळीनंतर प्रसिध्द केले जाणार आहे.

 

विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा विद्यापीठात होणार आहे. स्पर्धेसाठी निवडलेल्या सहा विद्याशाखांच्या युजी, पीजी आणि पीपीजी च्या प्रत्येक प्रकल्पासाठी फक्त एक संशोधनक विद्यार्थ्यांना आपले संशोधन प्रकल्प सादर करता येणार आहेत. पात्र विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी संशोधन कोड देण्यात येईल. विद्यापीठाने प्रसिध्द केलेल्या यादीतील संशोधक विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; शैक्षणिक पात्रतेबाबत MPSC कडून दिलासा

 

संशोधक विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. संशोधन सादरीकरणाच्या ठिकाणी प्राचार्य, शिक्षक, पालक किंवा संशोधन समन्वयकांनाही उपस्थित राहता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिध्दता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले यांनी याबाबत संलग्न महाविद्यालये व संस्थांचे प्राचार्य, संचालकांना याबाबतच्या सुचना दिल्या आहेत.

 

विभागीय स्पर्धेतील विद्यापीठस्तरीय स्पर्धेत पात्र ठरलेल्या २७३ विद्यार्थ्यांपैकी ५५ विद्यार्थी विज्ञान विद्याशाखेतील आहेत. तर कृषी विद्याशाखेतील ४३, मेडिसीन व फार्मसी विद्याशाखेतील ४७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मानवता, भाषा व कला विद्याशाखेतील ४२, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी शाखेतील ४० आणि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ४६ विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO