आजपासून एसएससी सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल भरती परीक्षा

उमेदवार ssc.gov.in  या अधिकृत वेबसाइटवरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

आजपासून एसएससी सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल भरती परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे कनिष्ठ अभियंता (सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) भरती परीक्षा आज (5 जून) पासून सुरू होत आहे. उमेदवारांना परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्र आधीच जारी करण्यात आले आहेत, उमेदवार ssc.gov.in  या अधिकृत वेबसाइटवरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

एसएससी जेई (SSC JE)ची परीक्षा 5, 6 आणि 7 जून 2024 रोजी देशभरातील नियुक्त केलेल्या परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेण्यात येणार आहे

एसएससी जेई परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रत आणि एक वैध ओळखपत्र (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/पॅन कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स) परीक्षा केंद्रावर सोबत ठेवणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र आणि ओळखपत्राशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी स्मार्ट घड्याळ, मोबाईल फोन, ब्लूटूथ उपकरण, इअरफोन, मायक्रोफोन, हेल्थ बँड किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट परीक्षा केंद्रात घेऊन जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे अयोग्य गॅझेट वापरल्यास, संबंधित उमेदवाराला परीक्षेत बसण्यापासून रोखले जाईल आणि कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते.

तसेच उमेदवारांनी वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर त्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी. निर्धारित वेळेनंतर उमेदवारांना परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे निर्देश एसएससीकडून देण्यात आले आहेत.