SPPU News : डॉ. दिलीप उके, प्रा. सुनिल भागवत यांच्यासह सात जणांचे विद्या परिषदेवर नामनिर्देशन

सदस्यत्वाची मुदत दि. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत किंवा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ६३ व ६४ मधील तरतूद अथवा महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशांच्या अधीन राहून यापैकी जे अगोदर घडेल, त्या तारखेस संपुष्टात येईल.

SPPU News : डॉ. दिलीप उके, प्रा. सुनिल भागवत यांच्यासह सात जणांचे विद्या परिषदेवर नामनिर्देशन
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) विद्या परिषदेवर (Academic Council) कुलपती व राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी सात सदस्यांचे नामनिर्देशन केले आहे. त्यांच्या सदस्यत्वाची मुदत दि. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत किंवा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ६३ व ६४ मधील तरतूद अथवा महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशांच्या अधीन राहून यापैकी जे अगोदर घडेल, त्या तारखेस संपुष्टात येईल.

 

विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, नामनिर्देशन केलेल्या सदस्यांमध्ये पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅन्ड रिसर्चचे संचालक प्रा. सुनिल भागवत, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट इंजिनिअर्सचे संचालक डॉ. मकरंद जोशी यांचा समावेश आहे.

संविधान दिन साजरा : समाजातील मुल्ये ही कायद्याला पुरक नाहीत - डॉ. सुखदेव थोरात

 

त्याचप्रमाणे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रिज अॅन्ड अॅग्रीक्लचरचे अध्यक्ष दिपक करंदीकर, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. दिलीप उके, डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रभारी संचालक संदीप शहारे आणि एनसीसी पुणेचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर मित्रा अर्जुन यांचेही नामनिर्देशन करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO