संविधान दिन साजरा : समाजातील मुल्ये ही कायद्याला पुरक नाहीत - डॉ. सुखदेव थोरात

सध्यस्थितीतही आपला समाज संविधानाच्या मूल्यांचे पालन करत नाही, त्यामुळे संविधानाचे मूल्य रूजविण्याची गरज आहे.तसेच  सतसद्विवेक बुद्धचा अभाव असेल तर चांगल्या गोष्टी पुढे जाऊ शकणार नाही.

संविधान दिन साजरा : समाजातील मुल्ये ही कायद्याला पुरक नाहीत - डॉ. सुखदेव थोरात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

संविधानात सामानतेला प्राधान्य देणारे कायदे असूनही समाजातील मुल्ये ही या कायद्याला पुरक नाही. त्यामुळे संविधानातील मूल्यांचे पालन करणे गरजेचे आहे.तसेच सामाजिक संबंध हे नेहमी नैतिकतेच्या आधारावर आसावेत, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात (Dr. Sukhdev Thorat former Chairman of University Grants Commission) यांनी रविवारी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज सेंटर व जनसंपर्क विभागाच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सुखदेव थोरात बोलत होते.यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ विजय खरे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा : क्लस्टर युनिव्हर्सिटी : उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीच करणार शंकांचे निरसन ; मुंबईत २९ नोव्हेंबरला राज्यस्तरिय कार्यशाळा

सध्यस्थितीतही आपला समाज संविधानाच्या मूल्यांचे पालन करत नाही, त्यामुळे संविधानाचे मूल्य रूजविण्याची गरज आहे.तसेच 
सतसद्विवेक बुद्धचा अभाव असेल तर चांगल्या गोष्टी पुढे जाऊ शकणार नाही.लोकशाही टिकवण्यासाठी अहिंसक मार्गाचा अवलंब केला पाहिजे,असे नमूद करून सुखदेव थोरात म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दूरदृष्टी होती. त्यांनी लोकशाही आत्मसात करतेवेळी येणाऱ्या १० अडचणी त्यावेळीच सांगितल्या होत्या. समानता, कायदा आणि प्रशासनातील समानता, नैतिकता, अल्पसंख्यांकांचे स्थान, हिंसा, इत्यांदीचे जर संविधानानुसार पालन केले नाही, तर ते आपल्यासाठी अडचणीचे ठरू शकते, असे त्यांनी सांगितले होते.

भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाले असून यानिमित्त आपण संविधानातील मूल्य, विचार, संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे, असे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकार यावेळी म्हणाले. तसेच या वर्षभरात यानिमित्त विविध कार्यक्रम राबविणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी उपस्थितांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले.कार्यक्रमास सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे  तसेच  शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव यांनी केले.