IAS, IPS नकोरे बाबा ; ग्रामीण युवकांना लष्कर, पोलीस दलाचे आकर्षण 

आयएएस होऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण तरुणांची टक्केवारी २.० टक्के आहे. तर फक्त १.४ टक्के लोकांना आयपीएस व्हायचे आहे.

IAS, IPS नकोरे बाबा ; ग्रामीण युवकांना लष्कर, पोलीस दलाचे आकर्षण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

उच्चपदस्थ शासकीय अधिकारी होण्यासाठी आयएएस (IAS)आणि आयपीएस (IPS)अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याला प्राधान्य देणारे ग्रामीण भागातील युवक आता लष्कर, पोलीस, अध्यापन, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी (Army, Police, Teaching, Medical and Engineering)या क्षेत्रात करिअर करण्यास प्राधान्य देतात, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

मुलांचे पहिले दोन पर्याय सैन्य आणि पोलिसात भरती होण्यासाठी आहेत, तर मुलींनी शिकवणे आणि वैद्यकीय व्यवसाय निवडणे पसंत केले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात मधील तरुणींना पोलीस दलात सामील व्हायचे आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ASAR च्या बियाँड बेसिक्स या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. 

हेही वाचा : गणित विषयाच्या शिक्षकांनीच नाही गिरवला गणिताचा धडा

या अहवालानुसार १३.८ टक्के मुलांना सैन्यात तर १३.६ टक्के मुलांना पोलीस दलात भरती व्हायचे आहे. तर आयएएस होऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण तरुणांची टक्केवारी २.० टक्के आहे. तर फक्त १.४ टक्के लोकांना आयपीएस व्हायचे आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मुलींपैकी १६ टक्के मुलींना अध्यापन क्षेत्रात करिअर करायचे आहे. तर १४.८ टक्के मुलींना डॉक्टर व्हायचे आहे. अध्यापन आणि वैद्यकशास्त्रानंतर १२.५ टक्के मुलींची पसंती पोलीस दलात तर ८.४ टक्के मुलींना नर्सिंग क्षेत्रात जायचे आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या संख्येने मुलींना पोलीस दलात भरती व्हायचे आहे. 

शेती आणि खेळात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांची संख्या फक्त २ टक्के आहे. तर ४.६ टक्के ग्रामीण तरुणांना सरकारी नोकऱ्या हव्या आहेत, तर खासगी नोकऱ्यांना प्राधान्य देणाऱ्यांची टक्केवारी १.६ आहे.