आंदोलनाची पन्नाशी, आमदारांच्या दाराशी ' अंगणवाडी ताईंचे धरणे आंदोलन   

आमदारांच्या कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने आंदोलनाची पन्नाशी आमदारांच्या दाराशी धरणे आंदोलन 23 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.

आंदोलनाची पन्नाशी, आमदारांच्या दाराशी ' अंगणवाडी ताईंचे  धरणे आंदोलन   

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भरिव मानधनवाढ, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, कामकाजासाठी नवीन मोबाईल / टॅब , ग्रॅज्युइटी, मासिक पेन्शन इ. मागण्यांसाठी गेलया ४ डिसेंबर २०२३ पासून अंगणवाडीताईंचे (Anganwadi tai)काम बंद आंदोलन सुरु आहे. तेव्हापासून आज अखेर वरील मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने विविध आंदोलने करण्यात आली. या आंदोलणासा २२ जानेवारी २०२४ रोजी ५० दिवस पूर्ण होत आहेत. मात्र, अद्याप आंदोलनाच्या मागण्यांना राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. म्हणून ज्या आमदारांच्या पाठबळावर सरकार बनते आणि चालते त्या आमदारांच्या कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने आंदोलनाची पन्नाशी आमदारांच्या दाराशी (movement at the door of MLAs )धरणे आंदोलन 23 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे,असे आंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार (president Nitin Pawar)यांनी सांगितले.

आंदोलनाच्या मागण्याबाबतचे निवेदन आमदारांना आंदोलनाच्या सुरुवातीलाच दिले आहे. मात्र अजून त्याचा उचित परिणाम दिसलेला नाही. आमदारांच्या पाठिंब्यावरच राज्य सरकार बनत व चालत असते. म्हणून बंद आंदोलनाला पन्नास दिवस पूर्ण होत आहेत. अंगणवाडीताईं मध्ये एकल (विधवा,परितक्त्या,प्रौढ कुमारिका इ.) महिलांचे प्रमाण मोठे आहे. तसेच अनेक अंगणवाडीताईंचे घर त्यांच्या तुटपुंज्या मानधनावर कसेतरी चालते. त्यामुळे हे पन्नास दिवस त्यांची परीक्षा घेणारे ठरले आहेत. यांची जाणीव आमदारांना करून दिली जाणार आहे.

हेही वाचा : एज्युवार्ता स्पेशल न्यूज: राम लल्ला मूर्ती निर्मितीमध्ये पुण्यातील या दिग्गजांचा सहभाग

नितीन पवार म्हणाले, गेल्या 50 दिवसापासून राज्यातील वाडी-वस्ती गावपाड्यामधील गरीब घटकातील 70 लाख चिमुकल्यांना पूरक पोषक आहार मिळाला नाही. ही बालके पूर्व प्राथमिक शिक्षणापासूनही वंचित राहिली आहेत.मात्र याविषयी राज्य सरकार गंभीर नाही. इतर अर्थपूर्ण विषयाकडे लक्ष पुरवणाऱ्या सरकारचे-मानवी विकासाशी संबंधित प्रश्न सोडवण्याला प्राधान्य नाही. म्हणून  या आंदोलन व मागण्यांकडे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार २३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ पासून १ वाजे पर्यंत राज्यात विविध ठिकाणी एकाचवेळी आमदारांच्या कार्यालयासमोर अंगणवाडीताईंचे धरणे आंदोलन होत आहे.

आंदोलनाला २२ जानेवारीलाच ५० दिवस पूर्ण होत आहेत.मात्र यादिवशी अयोध्येतील कार्यक्रमामुळे पोलीस यंत्रणेवर येणाऱ्या ताणामध्ये भर नको.म्हणून धरणे आंदोलन २३रोजी होत आहे. आंदोलनात प्रत्येक ठिकाणी सुमारे १०० वर अंगणवाडी ताई सहभागी असतील. आ.सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर), आ.चेतन तुपे (हडपसर) , (पर्वती) आ.माधुरी मिसाळ,(कोथरूड) आ. चंद्रकांत पाटील , (कसबा)-आ.रविंद्र धंगेकर , कॅन्टोन्मेंट चे आमदार सुनील कांबळे ,आमदार भीमराव तापकीर खडकवासला मतदारसंघ यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन होईल,असेही नितीन पवार यांनी सांगितले.