महावितरण भरती : ५ हजार ३४७ जागांसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ 

अर्ज भरण्यासाठी २० जूनपर्यंत मुदतवाढ आली आहे. इच्छुक उमेदवारांनीअधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in/ वर जाऊन आपला ऑनलाइन पद्धतीने अर्ज पुर्ण करावा. 

महावितरण भरती :  ५ हजार ३४७ जागांसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 महावितरण कंपनीमध्ये (Mahavitaran Company) विद्युत सहायक (Electrical Assistant) पदांसह विविध एकूण 5 हजार 347 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) सुरु आहे. यामध्ये पदांनुसार पात्र आणि इच्छूक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून अर्ज करण्यास पुन्हा एकदा २० जूनपर्यंत मुदतवाढ (Extension till June 20) देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजूनही अर्ज भरला नसेल तर आत्ताच अधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in/ वर जाऊन अर्ज भरता येईल. 

अर्ज भरण्यासाठी यापुर्वी देण्यात आलेली मुदत संपली असून उमेदवारांकडून होत असलेल्या मागणीचा विचार करुन महावितरणने २० जुनपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली आहे. महावितरण कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यभरात विद्युत सहायक, कनिष्ठ सहाय्यक, पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदांच्या एकूण 5 हजार 347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 

या भरती प्रक्रियेत एकुण 5 हजार 347 जागा आहेत. वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST तर  मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST असे परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त आरक्षाणातून अर्ज दाखल करु शकले नाहीत असे उमेदवार व जे उमेदवार विविध कारणास्तव अर्ज दाखल करु शकले नाहीत, अशा सर्व उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरणेकरीता दि. २० जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, असे जाहीरात पत्रात नमूद करण्यात आले आहे.