ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी

उमेदवार ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स bis.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने (BIS) भरतीसाठी  अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सहाय्यक संचालक (Assistant Director), वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant), सहायक विभाग अधिकारी (Assistant Department Officer), लघुलेखक (Stenographer), वरिष्ठ सचिवालय सहाय्यक (Senior Secretariat Assistant) यासह अनेक पदांची भरती(recruitment) केली जाणार आहे. उमेदवार(candidates) ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स bis.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. 

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 345 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी, उमेदवारांची पदानुसार शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये CA, MBA, MA, PG, पदवीधर आणि 10वी पास या पात्रतेचा समावेश आहे. पदांनुसार कौशल्य चाचणीही घेतली जाणार आहे. पात्रतेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 27 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट देण्यात आली आहे.

दरम्यान, सहाय्यक संचालक पदासाठी अर्ज शुल्क 800 रुपये असणार आहे, तर इतर पदांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी/पात्रता चाचणी, दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय तपासणी या फेर्‍यांमधून योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.