बीबीए, बीसीए प्रवेशाच्या 60 टक्के जागा रिक्त ; पुन्हा सीईटी घेण्याची मागणी

बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रमासाठी यंदा प्रथमच प्रवेश परीक्षा घेण्यात आली. २९ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेला ४८ हजार विद्यार्थी उपस्थित होते.

बीबीए, बीसीए प्रवेशाच्या 60 टक्के जागा रिक्त ; पुन्हा सीईटी घेण्याची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षातर्फे बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रमासाठी (BBA, BMS, BCA, BBM courses) यंदा प्रवेश परीक्षा घेण्यात आली. २९ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेला ४८ हजार विद्यार्थी उपस्थित होते. राज्यात १ लाख ८ हजार ७४१ एवढ्या जागा असताना केवळ ४० टक्के जागा भरल्या जातील एवढेच उमेदवार परीक्षेस उपस्थित होते. त्यामुळे उर्वरित ६० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सीईटी सेलने पुनर्परीक्षा (Re-examination will be held) घ्यावी असही मागणी केली जात आहे.

बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीसीए या अभ्यासक्रमासाठी यंदा प्रवेश परीक्षा घेण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत कल्पना नसल्याने हे विद्यार्थी सीईटी परीक्षेापासून वंचित राहिले, असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यानंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी बंधनकारक असल्याचे समजले. त्यामुळे १ लाख ८ हजार ७४१ जागा असताना २९ मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेला केवळ ४८ हजार १३५ विद्यार्थी उपस्थित राहिले.परिणामी उर्वरित जागा रिक्त राहण्याची भीती संस्थांचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

विद्यापीठांकडून या अभ्यासक्रमांचे नावेही बदलण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक व विविध संघटनांकडून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत मागणी होऊ लागली आहे. त्यातच जवळपास ६० हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी व महाविद्यालयांचे होणारे नुकसान लक्षात घेता सीईटी कक्षाने यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पनर्परीक्षेबाबतचा प्रस्ताव पाठवला असून, यावर विचारविनिमय सुरू आहे.