RTE Update: आरटीई लॉटरीचे प्रवेश लांबणीवर; या कारणामुळे होतोय उशीर

12 जून रोजी सुनावणी घेतली जाणार होती.परंतु,काही कारणास्तव ही सुनावणी होऊ शकली नाही.दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जून रोजी सुनावणी होईल,अशी अपेक्षा होती.परंतु,आजही सुनावणी झाली नाही.आता ही सुनावणी येत्या 18 जून रोजी होणार आहे.

RTE Update: आरटीई लॉटरीचे प्रवेश लांबणीवर; या कारणामुळे होतोय उशीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

RTE admission:  शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई - RTE) 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी लॉटरी (Lottery for RTE admission)काढण्यात आली.मात्र, काही शाळांनी आरटीईच्या जागांवर (RTE seats)विद्यार्थ्यांना प्रवेश दिले.त्यावर 12 व 13 जून रोजी न्यायालयात सुनावणी (Court hearing)होणार होती.परंतु, दोन्ही दिवशी सुनावणी होऊ शकली नाही.आता पुढील सुनावणी 18 जून रोजी आहे.त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी पालकांना आणखी काही दिवस वाट (Parents waiting for RTE admission)पहावी लागणार आहे.न्यायालयाच्या सुनावणीनंतरच प्रवेशाचा निर्णय घेतला जाणार आहे,असे सूत्रांनी सांगितले.

आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. राज्यातील 9  हजार 217 शाळांमधील 1  लाख 5 हजार 399 जागांवरील प्रवेशासाठी 2 लाख 42 हजार 972 अर्ज आले आहेत.शिक्षण विभागातर्फे प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी काढली असली तरी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.कारण काही शाळा न्यायालयात गेल्या आहेत.या शाळांनी आरटीई 25 टक्के राखीव जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत.त्यामुळे शाळांच्या प्रवेशाचे काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला.त्यावर 12 जून रोजी सुनावणी घेतली जाणार होती.परंतु,काही कारणास्तव ही सुनावणी होऊ शकली नाही.दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जून रोजी सुनावणी होईल,अशी अपेक्षा होती.परंतु,आजही सुनावणी झाली नाही.आता ही सुनावणी येत्या 18 जून रोजी होणार आहे,असे एका याचिकाकर्त्याने सांगितले. 

शासनाने पूर्वी केवळ शासकीय, अनुदानित  व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्यायाने आरटीईचा प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र,न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली.परिणामी शासनाला मागील वर्षाप्रमाणे केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया नव्याने राबवावी लागली.दरम्यान, या प्रकरणी आणखी काही याचिका न्यायालयात दाखल झाल्या.परंतु,त्यावर सुनावणी झाली नाही.आता 18 जून रोजी होणाऱ्या सुनावणी होईल. या सुनावणीनंतर ऑनलाईन लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.त्यामुळे पालकांना 18 जूनपर्यंत प्रवेशासाठी वाट पहावी लागणार आहे.