गांजा प्रकरण विद्यापीठाच्या अंगलट; कारवाईला विलंब केल्याने रविंद्र धंगेकर, सुषमा अंधारे आक्रमक

गांजा सापडल्यानंतर 13 दिवस उलटून गेले तरीही विद्यापीठाने कारवाई का केली नाही? अशा कोणत्या प्रकारची प्रक्रिया विद्यापीठाकडून केली जात होती, याचा खुलासा विद्यापीठाने करावा.

गांजा प्रकरण विद्यापीठाच्या अंगलट; कारवाईला विलंब केल्याने रविंद्र धंगेकर, सुषमा अंधारे आक्रमक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) वसतिगृहामधील एका विद्यार्थ्याकडे गांजा सापडल्याची घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी कारवाईस विलंब झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar)व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Shiv Sena leader Sushma Andhare)यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेऊन याबाबत विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला. तसेच सरकार विद्यापीठ हायजॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही धंगेकर यांनी यावेळी केला.

पुणे विद्यापीठ गेल्या काही दिवसांपासून नवनवीन वादांमुळे चर्चेत आले आहे. त्यात आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्किल डेव्हलपमेंट विभागातील एक विद्यार्थी व सतीगृहात गांजा घेऊन आल्याचे निष्पन्न झाले. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने कारवाई का केली नाही? याचा जाब विविध संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला विचारला. विद्यापीठाने याप्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना या घटनेचा तपशील का दिला नाही? यावर विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला. रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले . तसेच या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, विद्यापीठाचे कुलगुरू, प्र- कुलगुरू व प्रभारी कुलसचिव यांच्याबरोबर आम्ही संवाद साधला. गांजा सापडल्यानंतर 13 दिवस उलटून गेले तरीही विद्यापीठाने कारवाई का केली नाही? अशा कोणत्या प्रकारची प्रक्रिया विद्यापीठाकडून केली जात होती, याचा खुलासा विद्यापीठाने करावा. तसेच विद्यापीठामध्ये नक्षलवादी घुसू नये म्हणून विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई केली जाते,असे सांगितले जाते.  त्यामुळे विद्यापीठाने ते नक्षलवादी कोण आहेत हे स्पष्ट करावे. गांजा प्रकरण लपवणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला जाईल, असाही इशारा सुषमा अंधारे यांनी यावेळी दिला. त्याचप्रमाणे, विद्यापीठात आमदार रोहित पवार यांनी एनएसयुआय व एसएफआय या संघटनेच्या कार्यकर्त्यांची संवाद साधला. त्यातील काही कार्यकर्त्यांवर विद्यापीठ प्रशासनाने विनाकारण गुन्हे दाखल केले, याचे उत्तर विद्यापीठ प्रशासनाने द्यावे,अशी मागणीही अंधारे यांनी केली.

 दरम्यान, विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे संपडलेला गांजा एका सुमारे 50 ग्रॅम होता, असे विद्यापीठातील अधिकारी सांगत आहेत.विद्यार्थ्यांकडे सापडलेला गांजा पोलिसांकडे देण्याची प्रक्रिया विद्यापीठाकडून मंगळवारी केली जात होती.संबंधित विद्यार्थ्याला वासतीगृहातून काढून टाकण्यात आले असून त्याचा विद्यापीठातील प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,असेही विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह विद्यापीठात गजानन थरकडे,युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन,  युवा सेना शहर प्रमुख राम थरकुडे, भुषण रानभरे, उमेश वाघ, राहूल शिरसाठ आदी उपस्थितीत होते.