दहावीसाठी गुणपडताळणी, छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करायचा

विद्यार्थ्यांकडून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी २८ मे ते ११ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. यासाठी http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

दहावीसाठी गुणपडताळणी, छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करायचा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा परीक्षेचा निकाल (10th Result 2024) जाहीर करण्यात आला आहे. मुल्यांकनाविषयी काही समस्या असतील तर विद्यार्थ्यांकडून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन (Mark checking, photocopies of answer sheets, revaluation) यासाठी २८ मे ते ११ जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. यासाठी http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती व सूचना देण्यात आल्या आहेत. 

दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात विद्यार्थ्यांना काही तफावत किंवा शंका वाटत असेल तर त्यांना २८ मेपासून ११ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने शुल्कासह अर्ज करणे आवश्यक आहे.मार्च २०२४ च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागवण्यासाठी ई-मेलद्वारे/संकेतस्थळावरुन/हस्तपोहोच / रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल व त्यांनी मागणी केलेल्या पध्द्तीने छायाप्रत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

मार्च २०२४ च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात प्रती विषय ३०० रुपये प्रमाणे शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.