वारकरी शिक्षण संस्थेत संस्थांचालकाकडून तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार

पुण्यातील आळंदी मधील शिक्षण संस्थेत हा धक्कादायक प्रकार घडला असून गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांवर संस्थाचालक अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वारकरी शिक्षण संस्थेत संस्थांचालकाकडून  तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वारकरी शिक्षण देणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील आळंदी मधील शिक्षण संस्थेत हा धक्कादायक प्रकार घडला असून गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांवर संस्थाचालक अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आळंदी पोलिसांनी आरोपी दासोपंत उंडाळकर (वय 52) याला या प्रकरणी अटक केली आहे. आळंदीमध्ये संस्थाचालक आणि शिक्षक म्हणून वावरणाऱ्या दासोपंत उंडाळकर याने आपल्याच संस्थेतील विद्यार्थ्यांवर नैसर्गिक अत्याचार केले आहेत.या संस्थेत 70 मुले वारकरी शिक्षण घेत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून आरोपी तीन अल्पवयीन मुलांना एकांतात बोलून त्यांच्यावर नैसर्गिक अत्याचार करत होता. पीडित मुलांनी आपल्या पालकांना याबाबत सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. आळंदी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून काळजीपोटी संस्थेतील इतर मुलांची सुद्धा विचारपूस सुरू केली आहे.