कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची नवी कार्यकारिणी; कार्याध्यक्षपदी प्रा. राहुल गोलांदे

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड बहुमताने करण्यात आली.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची नवी कार्यकारिणी; कार्याध्यक्षपदी प्रा. राहुल गोलांदे
Prof. Rahul Golande

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची (Pune District Junior CollegeTeachers Organisation) २०२३-२०२६ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मंचर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. लक्ष्मण रोडे (Prof. Laxman Rode) यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील प्रा. राहुल गोलांदे (Prof. Rahul Golande) यांची कार्याध्यपदी निवड करण्यात आली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड बहुमताने करण्यात आली. प्रा. रोडे आणि प्रा. गोलांदे यांची अनुक्रमे अध्यक्ष व कार्याध्यक्षपदी तर चिंचवडमधील गेंदिबाई चोपडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. विक्रम काळे यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा : संच मान्यतेचे काय होणार? प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची पडताळणी करा!

प्रा.राहुल गोलांदे हे बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात २००७ पासून संरक्षणशास्त्र या विषयासाठी कार्यरत आहे. त्यांनी आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडविले आहेत. तसेच संघटनेने आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या आंदोलनात सहभागी होऊन काम करत आहेत.

महाविद्यालयला हा बहुमान मिळवून दिल्याबद्दल महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे, सचिव प्रा. जयवंत घोरपडे, सहसचिव सतीश लकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांचेसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2