आता वैद्यकीय महाविद्यालयांचे होणार रेटिंग; विद्यार्थ्यांचे महत्व वाढणार

‘एनएमसी’च्या वैद्यकीय मूल्यांकन आणि रेटिंग मंडळाचे सदस्य डॉ. जे. एल. मीना यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी सांगितले.

आता वैद्यकीय महाविद्यालयांचे होणार रेटिंग; विद्यार्थ्यांचे महत्व वाढणार
Medical College Rating

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुढील वर्षापासून देशातील वैद्यकीय महाविद्यालयांचे (Medical College) रेटिंग होणार आहे. नुकतेच नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) रेटिंगची जबाबदारी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडे सोपवली आहे. याअंतर्गत सध्याच्या आणि माजी विद्यार्थ्यांच्या (Students) फीडबॅकवर कॉलेजचे रेटिंग (College Rating) अवलंबून असेल. त्यामुळे या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे मत महत्वाचे ठरणार आहे. (Medical Colleges in India)

 

‘एनएमसी’च्या वैद्यकीय मूल्यांकन आणि रेटिंग मंडळाचे सदस्य डॉ. जे. एल. मीना यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी सांगितले की, "परिषद प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयातील १०० माजी विद्यार्थ्यांकडून  ऑनलाइन फॉर्म भरून घेईल. तसेच, सध्या शिकत असलेल्या सुमारे २५ टक्के विद्यार्थ्यांची यादृच्छिकपणे निवड करून अभिप्राय घेतला जाईल. या सर्वांची ओळख गुप्त राहणार आहे.

JEE Advanced परीक्षेची तारीख जाहीर; एप्रिलमध्ये सुरू होणार प्रक्रिया

 

विद्यार्थ्यांच्या फीडबॅकच्या आधारे मेडिकल कॉलेजचे रेटिंग ठरवले जाणार असून देशातील सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेज त्यांच्या रेटिंगवरून ओळखले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चांगले रेटिंग मिळालेल्या महाविद्यालयांची प्रतिमा चांगली असेल तर खराब रेटिंग असलेल्या महाविद्यालयांवरही कारवाई होऊ शकते.

 

रेटिंगसाठी तयार केलेल्या निकषांमध्ये अध्यापन विभाग, रुग्णालय आणि वसतिगृहे, अभ्यासक्रम, संशोधन आणि प्रयोगशाळा सुविधांमध्ये सुरक्षा उपायांची अंमलबजावणी हे समाविष्ट आहे. २०२४-२५ या शैक्षणिक सत्रापासून वैद्यकीय महाविद्यालयांचे मूल्यांकन आणि मानांकन सुरू होईल. महाविद्यालयाच्या वसतिगृहांमध्ये पुरेशा मनोरंजन, भोजन आणि २४ तास सुरक्षा सुविधा आहेत की नाही हे या रेटिंगद्वारे पाहिले जाईल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO