नवनियुक्त अंगणवाडी सेविकांची ‘दिवाळी’; राज्य शासनाकडून मोठे गिफ्ट

मार्च २०२३ पर्यंत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना आतापर्यंत भाऊबीज दिली जात होती.

नवनियुक्त अंगणवाडी सेविकांची ‘दिवाळी’; राज्य शासनाकडून मोठे गिफ्ट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारने (Maharashtra Government) दिवाळीनिमित्त (Diwali) मोठे गिफ्ट दिले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी ‘भाऊबीज भेट’ रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच नवनियुक्त सेविकांनाही भाऊबीज भेट दिली जाणार आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंतच्या कालावधीत प्रथमच विशेष बाब म्हणून नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

कंत्राटी पदांच्या भरतीतही दिव्यांगांना आरक्षण; राज्य सरकारचे आदेश

 

मार्च २०२३ पर्यंत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना आतापर्यंत भाऊबीज दिली जात होती. आता १ एप्रिल २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज भेट दिली असून यापूर्वी दिलेली भाऊबीज भेट म्हणून दिलेले ३७ कोटी ३३ लाख रुपये  आणि आज नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना  भाऊबीज भेट म्हणून दिलेले ३ कोटी असे एकूण ४० कोटी रुपये वितरित  करण्यात आले आहेत.

 

या बाबतचा शासन निर्णय नुकताच महिला व बालविकास  विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO