नवीन PG वैद्यकीय अभ्यासक्रम आणि जागा वाढवण्यास NMC ची मंजुरी 

आता बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पीजी अभ्यासक्रमही सुरू करता येणार आहेत. 

नवीन PG वैद्यकीय अभ्यासक्रम आणि जागा वाढवण्यास NMC ची मंजुरी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी नवीन PG वैद्यकीय अभ्यासक्रम (pg medical course) सुरू करण्यासाठी आणि PG च्या जागा वाढवण्यासाठी 153 अर्ज मंजूर केले आहेत. त्यामुळे 110 महाविद्यालयांमध्ये नवीन पीजी(New PG in 110 colleges)वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. तर 43 महाविद्यालयांमध्ये पीजी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्यात येणार आहेत. 

सध्या देशात एमबीबीएसच्या १,०८,९९० जागा आहेत, तर पीजीच्या ६९,६९४ जागा आहेत. गेल्या महिन्यात आयोगाच्या वैद्यकीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळाने (MARB) 101 अर्ज मंजूर केले होते.आता बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पीजी अभ्यासक्रमही सुरू करता येणार आहेत. 

एमएस जनरल सर्जरी, एमएस-ईएनटी, एमएस सायकियाट्री, एमडी कम्युनिटी मेडिसिन, एमडी पॅथॉलॉजी, एमडी रेडिओ डायग्नोसिस, एमडी ॲनेस्थेसियोलॉजी यासह अनेक अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये वाढ होणार आहे. 2028-29 पर्यंत PG जागांची संख्या 1,08,990 पर्यंत वाढवण्याच्या योजनेवर काम केले जात आहे.

2013-14 मध्ये देशात 387 वैद्यकीय महाविद्यालये होती, ती आता 706 झाली आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्याही वाढत आहे. एमबीबीएस केल्यानंतर पीजीच्या जागा वाढविण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना देशात पीजीसाठी अधिक संधी मिळतील.

देशातील पीजी मेडिकल कॉलेजमध्ये NEET PG परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जातो. तर एमबीबीएस इत्यादी UG वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये NEET UG च्या आधारे प्रवेश दिला जातो. केंद्रीय आणि राज्य कोट्यासाठी NEET UG समुपदेशन स्वतंत्रपणे आयोजित केले जाते. केंद्रीय कोटा समुपदेशन पूर्ण झाल्यानंतरच राज्य कोटा समुपदेशन होते.