आयुष पोस्ट ग्रॅज्युएट :AIAPGET परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी 

आयुष पोस्ट ग्रॅज्युएट :AIAPGET परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट (AIAPGET) परीक्षा देण्याची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती समोर आली आहे. AIAPGET परीक्षेत बसण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने इंटर्नशिप पूर्ण करण्याची मुदत वाढवली आहे. विद्यार्थ्यांकडे आता त्यांची इंटर्नशिप (Internship)पूर्ण करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंत वेळ आहे. इंटर्नशिप पूर्ण करण्याची पूर्वीची तारीख 30 जून 2024 होती.

पदव्युत्तर आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी AIAPGET 6 जुलै 2024 रोजी घेण्यात येईल. शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाईल.

NTA द्वारे अधिकृत अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, "सचिव, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन (NCISM), नवी दिल्ली-110058 यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्राच्या अनुषंगाने, AIAPGET 2024 परीक्षेसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची तारीख ठरवण्यात आली आहे. NCISM आणि एनसीएच द्वारे इंटर्नशिप पूर्ण करण्याची मुदत 30 जून वरून 31 जुलै 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी आधीच शुल्कासह अर्ज सबमिट केला आहे ते सुधार विंडोच्या वेळी त्यांची इंटर्नशिप पूर्ण होण्याची तारीख भरू शकतात."

NTA च्या https://exams, nta.ac.in/AIAPGET/. या अधिकृत वेबसाईट वरून इच्छूकांना AIAPGET साठी नोंदणी करता येईल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 15 मे 2024 आहे. क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/UPI द्वारे शुल्काचा यशस्वी व्यवहार करण्याची अंतिम तारीख 16 मे 2024 आहे.

वेबसाइटवरील अर्जाच्या तपशिलांमध्ये सुधारणा 17-19 मे 2024 पासून सुरू होईल. प्रवेशपत्रे 2 जुलै 2024 पासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.