CBSE Exam : 10वी-12वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे CBSE बोर्डाने २०२५-२६ या शैक्षणिक सत्रासाठी प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना सहजपणे तपासता यावे यासाठी CBSE ने 10वीं-12वी परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

CBSE Exam : 10वी-12वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Examinations for 10th and 12th students) महत्वाची बातमी आहे. CBSE बोर्डाने २०२५-२६ या शैक्षणिक सत्रासाठी (Academic session 2025-26) प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर (Schedule announced) केले आहे. CBSE ने 10वी-12वी परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य, जागा राखीव ठेवण्याचा सरकारचा निर्णय
सीबीएसईने जाहीर केलेल्या तात्पुरत्या तारखेनुसार, दहावी आणि बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १७ फेब्रुवारी ते ४ एप्रिल २०२५ दरम्यान घेतल्या जाणार आहेत. सीबीएसई शाळा जानेवारीपूर्वी ६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण करू शकतात. थंडी नसलेल्या झोनसाठी या परीक्षा १ जानेवारी २०२६ पासून सुरू होतील. २९ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी आणि छठ पुजा हे सण संपत आहेत. त्यानंतरच सीबीएसईच्या परीक्षा सुरू होतील. सीबीएसईने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून प्रॅक्टीकल परीक्षा, प्रोजेक्ट, इंटरनल असेसमेंट्स सुरू होतील.
सीबीएसई बोर्डाने शाळांना विद्यार्थ्यांच्या यादी तयार करण्याचे आणि बाह्य परीक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, दहावी आणि बारावीच्या परीक्षा १७ फेब्रुवारीपासून सुरू होतील. दहावीच्या बोर्ड परीक्षा ९ मार्च रोजी संपतील. तर बारावीच्या परीक्षा ९ एप्रिल रोजी संपतील. दहावीची परीक्षा १७फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या वेळेत घेतल्या जातील. तर बारावीच्या परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या वेळेत घेतल्या जातील. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.