फर्ग्युसन महाविद्यालयाकडून पुरग्रस्तांना दिवाळीनिमित्त मदत 

“विद्यार्थ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात त्यांना आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या वतीने अशी मदत भविष्यातही करण्यात येईल.”

फर्ग्युसन महाविद्यालयाकडून पुरग्रस्तांना दिवाळीनिमित्त मदत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजच्या वतीने कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयामधील पूरग्रस्त २०० विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त किराणा साहित्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्याम नारायण मुडे यांच्या हस्ते झाले. 

या कार्यक्रमास कडा येथील आनंदराव धोंडे कॉलेजचे प्राचार्य डॉ. विधाते हेही  उपस्थित होते. या वेळी बोलताना डॉ. मुडे म्हणाले, “विद्यार्थ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात त्यांना आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या वतीने अशी मदत भविष्यातही करण्यात येईल.”

या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून त्यांनी फर्ग्युसन कॉलेजचे आभार मानले. सामाजिक कार्यात फर्ग्युसन कॉलेज नेहमीच अग्रेसर राहिले असून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.