यूजीसी-नेट परीक्षांच्या तारखा जाहीर, ३१ डिसेंबरपासून परीक्षा..
अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख देखील ७ नोव्हेंबर २०२५ आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्या सुधारण्यासाठी १० नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुधारणा विंडो उपलब्ध असेल. यूजीसी नेट डिसेंबर २०२५ परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ नोव्हेंबर आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
यूजीसी-नेट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) यूजीसी नेट डिसेंबर २०२५ परीक्षेचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर (NET December 2025 exam schedule announced) केले आहे. ही परीक्षा ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत (Examination from December 31 to January 7) देशभरातील विविध केंद्रांवर संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, उमेदवार ७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख देखील ७ नोव्हेंबर २०२५ आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्या सुधारण्यासाठी १० नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुधारणा विंडो उपलब्ध असेल. यूजीसी नेट डिसेंबर २०२५ परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ नोव्हेंबर आहे.
एनटीएने या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असल्या, तरी परीक्षा कोणकोणत्या शहरांमध्ये आणि कोणत्या केंद्रांवर होईल, याची यादी एनटीएच्या https:// ugcnet. nta. nic. in या संकेतस्थळावर परीक्षेच्या १० दिवस आधी प्रसिद्ध होणार आहे. ही परीक्षा संपूर्ण देशभरात ८५ विविध विषयांसाठी कॉम्प्युटर बेस्ड पद्धतीने होईल. परीक्षेचे स्वरूप दोन पेपरचे असेल आणि दोन्ही पेपर एकाच सत्रात तीन तासांमध्ये घेतले जातील. परीक्षेत एकूण ३०० गुण असतील आणि १५० वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.