पुन्हा संधी!शिक्षकांना प्रशिक्षणासाठी २५ऑक्टोबर ते ३नोव्हेंबरपर्यंत मुदत

विविध टप्प्यांत आणि तुकड्यांत घेतलेल्या प्रशिक्षणादरम्यान ५ हजार ५२७ शिक्षक अनुत्तीर्ण झाले, तर ३४ हजार ३१४ शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यापैकी ३३ हजार ५७२ शिक्षक प्रशिक्षणादरम्यान घेतलेल्या चाचण्यांमध्ये उत्तीर्ण ठरले. त्यामुळे अनुपस्थित राहिलेल्या पाच हजारांपेक्षा जास्त शिक्षकांनी पुन्हा प्रशिक्षण घ्यावे, अशी मागणी 'एससीईआरटी' कडे केली होती.

पुन्हा संधी!शिक्षकांना प्रशिक्षणासाठी २५ऑक्टोबर ते ३नोव्हेंबरपर्यंत  मुदत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिक्षकांच्या वेतनश्रेणीतील बदलासाठी आवश्यक असलेल्या आणि जून महिन्यात पार पडलेल्या वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणात (Senior and Selection Pay Scale Training) अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकांना आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) एक संधी देऊ केली आहे. या शिक्षकांसाठी २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत प्रशिक्षण (Training period from 25th October to 3rd November) होणार असून, त्यासाठी नव्याने नोंदणी शुल्क (registration fee) भरण्याची गरज नसेल. या निर्णयामुळे जून महिन्यात प्रशिक्षण हुकलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पॅट परीक्षा ! गणित, इंग्रजीचे पेपर उत्तरांसह 'यू ट्यूब'वर व्हायरल; 'एससीईआरटी'च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

राज्यातील प्रशिक्षण प्राथमिक, माध्यमिक विविध केंद्रांवर हे घेतले होते. राज्यातील माध्यमिक, उच्च आणि अध्यापक विद्यालयांतील एकूण ४० हजार ८१ शिक्षकांनी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३९ हजार ८४१ शिक्षक प्रशिक्षणासाठी पात्र ठरले. विविध टप्प्यांत आणि तुकड्यांत घेतलेल्या प्रशिक्षणादरम्यान ५ हजार ५२७ शिक्षक अनुत्तीर्ण झाले, तर ३४ हजार ३१४ शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यापैकी ३३ हजार ५७२ शिक्षक प्रशिक्षणादरम्यान घेतलेल्या चाचण्यांमध्ये उत्तीर्ण ठरले. त्यामुळे अनुपस्थित राहिलेल्या पाच हजारांपेक्षा जास्त शिक्षकांनी पुन्हा प्रशिक्षण घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटना, राज्य शिक्षक परिषद, राज्य मुख्याध्यापक महासंघ, शिक्षक सेना, अशा विविध संघटनांनी 'एससीईआरटी' कडे केली होती.

या संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले असून 'एससीईआरटी' ने प्रशिक्षण पूर्ण न झालेल्या शिक्षकांसाठी नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. २५ ऑक्टोबर २०२५ ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाची नवी फेरी घेण्यात येणार आहे. मागील सत्रात प्रशिक्षण अपूर्ण राहिलेल्या किंवा प्रशिक्षण पूर्ण केले तरी चाचणी अपूर्ण राहिलेल्या शिक्षकांना या फेरीत सहभागी होता येईल. विशेष म्हणजे, या शिक्षकांना पुन्हा नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही.

राज्यातील सरकारी वेतनावर असलेल्या शिक्षकांच्या सेवेला १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होते, तर २४ वर्षांनंतर ते निवडश्रेणीसाठी पात्र ठरतात. या दोन्ही वेतनश्रेणीसाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते. होणार्‍या प्रशिक्षणादरम्यान आणि त्यानंतर चाचण्या उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना प्रमाणपत्र दिले जाते आणि वेतनश्रेणीत बदल लागू होतो. या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असते.