मुक्त विद्यालय मंडळ : पाचवी, आठवीच्या मुल्यमापनाचा निकाल ६ मे रोजी प्रसिद्ध होणार

मूल्यमापनाचा निकाल ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळ www.msbos.mh-ssc.ac.in वर सोमवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येईल.

मुक्त विद्यालय मंडळ : पाचवी, आठवीच्या मुल्यमापनाचा निकाल ६ मे रोजी प्रसिद्ध होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या (Maharashtra State Open School Board) वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीच्या मूल्यमापनाचा निकाल (Evaluation results) सोमवारी (दि.६ मे ) जाहीर होणार (It will be announced on Monday, May 6) आहे. या मूल्यमापनाचा निकाल ऑनलाईन पद्धतीने (Online Result Method) www.msbos.mh-ssc.ac.inया अधिकृत संकेतस्थळावर सोमवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळांमार्फत इयत्ता ५ वी  व इयत्ता ८ वी मध्ये प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन १२ मार्च, २०२४ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या मुल्यामापनाचा निकाल उद्या दुपारी जाहीर करण्यात येणार आहे. 

संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येणार आहे. विद्यार्थ्याला संकेतस्थळावरच माहितीची प्रत घेता येईल. पात्र,  विद्यार्थ्यांना त्यांनी इयत्ता ५ वी, ८ वी पर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरित करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाने दिली आहे.