माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये! नववीतील विद्यार्थिनीची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या

राज्यातील मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आरक्षणासाठी तरुणांकडून आत्महत्या केल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये! नववीतील विद्यार्थिनीची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, यासाठी मागील काही दिवसांपासून राज्यात (Maharashtra) आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. आता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनेही घरातच गळफास घेत आत्महत्या (Students Suicide) केल्याची घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील सोमेश्वर गावातील कोमल तुकाराम बोकारे (Komal Bokare) हिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येपुर्वी तिने चिठ्ठी लिहिली होती. मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळावे, असे तिने लिहून ठेवले आहे.

 

राज्यातील मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आरक्षणासाठी तरुणांकडून आत्महत्या केल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. राज्य सरकारसह मनोज जरांगे पाटील यांनीही आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्यानंतरही हे सत्र सुरूच राहिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

 

कोमल ही नववीत शिकणारी विद्यार्थिनी होती. तिचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून तिला चार बहिणी आहेत. एक एकर शेतीत राबून कोमलचे कुटूंब उदरनिर्वाह करत आहे. अशातच कोमलने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यामुळे बोकारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय?

कोमलने आत्महत्या करण्यापुर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘’मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावं. माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये. आई अण्णा मला माफ करा. तुमची कोमल.’’ कोमलने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO