राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान; राज्यस्तरीय समित्या स्थापन

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उ्ततरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, या उद्देशाने हे अभियान राबविले जाणार आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान; राज्यस्तरीय समित्या स्थापन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेय शिक्षण विभागाकडून (School Education Department) राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ (Majhi Shala Sundar Shala) हे अभियान राबविले जाणार आहे. हे अभियान राज्यात १ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत राबवले जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून राज्यस्तरीय सुकाणू समिती आणि कार्यकारी समिती नेमण्यात आली आहे.

 

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उ्ततरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, त्यातून स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्त्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, या उद्देशाने हे अभियान राबविले जाणार आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविले जाणार आहे.

अनुदानित शाळा पाडल्या जातायेत बंद? कुठे व्यावसायिक संकुल उभारण्याचा घाट, तर कुठे जमिनीचा वाद

 

अभियानाची रुपरेषा निश्चित करणे व त्यावरील देखरेख व नियंत्रणासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे समितीचे अध्यक्ष असतील. प्रधान सचिवस, आयुक्त, शिक्षण संचालक यांच्यासह १५ सदस्य या समितीत असणार आहेत. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यकारी समिती गठीत करण्यात आली असून शिक्षण आयुक्त या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. या समितीमध्ये आठ सदस्य असतील.

 

दरम्यान, ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन असेल. शालाबाह्य मुलांची संख्या वाढविणे, विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती, शाळेच्या परिसराची स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता आदी बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमधील कलागुण व कौशल्यालाही प्रोत्साहन देण्याचे नियोजन आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO