प्रत्येक जिल्ह्यात होणार बहुउद्देशीय संगणक केंद्र; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विभागाने ई-वाचनालय व अभ्यासिका राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करणे आवश्यक आहे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

प्रत्येक जिल्ह्यात होणार बहुउद्देशीय संगणक केंद्र; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील शिक्षण (Education) क्षेत्रात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होण्यासाठी तसेच ऑनलाईन शिक्षण, प्रशिक्षण, ऑनलाईन मुल्यमान यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या हेतूने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बहुउद्देशिक संगणक केंद्र (Multipurpose computer center) स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Governemnt) घेतला आहे. शिक्षण विभागाकडून (Education Department) ही केंद्र स्थापन केली जाणार असून त्यामध्ये ५० ते १५० संगणक आसन क्षमता असेल.

 

शालेय शिक्षण विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विभागाने ई-वाचनालय व अभ्यासिका राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा संदर्भ त्यासाठी देण्यात आला आहे.

अखेर राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर प्रतिक्रियांसाठी दिली मुदतवाढ

 

संगणक केंद्रासाठी सुमारे ६० कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे. उच्चस्तरीय सचिव समितीची दि. ५ सप्टेब रोजी बैठक झाली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांवर सोपविण्यात आली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k