GCC-TBC : शासकीय संगणकीय टायपिंग परीक्षेची ऑनलाईन प्रक्रिया सुरू

परिषदेतर्फे राज्यात वर्षातून दोन वेळा जीसीसी टीबीसी संगणकीय टायपिंग परीक्षा घेतल्या जातात. प्रत्येक विषयासाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम असून प्रती विषय ६ हजार ५०० रुपये इतके शुल्क आकारले जाते.

GCC-TBC : शासकीय संगणकीय टायपिंग परीक्षेची ऑनलाईन प्रक्रिया सुरू

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेशी (MSCE) संलग्न असलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC)  या परीक्षेची (Online Typing Exam) ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही परीक्षा एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे (Nandakumar Bedse) यांनी दिली. त्याचप्रमाणे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांनी नियमबाह्य कामे केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले.

 

इच्छुक विद्यार्थ्यांनी https://www.mscepune.in/gcc/CT_INST_MUMBAI.aspx या लिंकवर आपल्या जवळच्या मान्यता प्राप्त टायपिंग संस्थांची यादी तपासून पाहावी. त्यानंतर त्या संस्थेला परिषदेने दिलेल्या प्रमाणपत्रावरील त्याच संस्थेचे नाव व पत्ता बरोबर असल्याची खातरजमा करूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

प्रत्येक जिल्ह्यात होणार बहुउद्देशीय संगणक केंद्र; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

 

परिषदेतर्फे राज्यात वर्षातून दोन वेळा जीसीसी टीबीसी संगणकीय टायपिंग परीक्षा घेतल्या जातात. प्रत्येक विषयासाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम असून प्रती विषय ६ हजार ५०० रुपये इतके शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर लघुलेखन परीक्षा देखील घेतल्या जातात. त्यासाठी देखील प्रवेश सुरू झाले असल्याची माहिती परिषदेमार्फत देण्यात आली आहे.

 

संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतानाच परीक्षेचा प्राथमिक अर्ज ऑनलाईन भरून घेतला जाणार आहे. यामुळे ऐनवेळी परीक्षा अर्ज भरून घेणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणे या गैरप्रकारांना आळा बसेल, असेही परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k