मुंबई विद्यापीठाला मानाचे पान! राजधानीत पहिल्या आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवाचे आयोजन 

विद्यार्थ्यांसह शिक्षकांमधील संशोधनवृत्तीला बळ देऊन राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अधिकाधिक सहभाग वाढवण्याचा उद्देश.

मुंबई विद्यापीठाला मानाचे पान! राजधानीत पहिल्या आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवाचे आयोजन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

युवा विद्यार्थ्यांमधील नवकल्पकता (Innovation), वैज्ञानिक दृष्टिकोन (scientific approach) ओळखून त्यांना संधी उपलब्धता करून देणे. विद्यार्थ्यांसह शिक्षकांमधील संशोधनवृत्तीला (Student Teacher Research) बळ देऊन राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील (State and international level) स्पर्धांमध्ये अधिकाधिक सहभाग वाढवणे, या उद्देशाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवाचे (International Exploration Research Festival) आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या आयोजनाचे पहिले यजमानपद मुंबई विद्यापीठास मिळाले.

भारतीय विद्यापीठ संघ (AIU) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात  11 आणि 12 मार्च 2024 या दोन दिवस चाललेल्या महोत्सवाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. देशभरातील 28 विद्यापीठे या संशोधन महोत्सवात सहभागी झाली होती. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धा म्हणून या संशोधन महोत्सवाचे आयोजन केले जात होते.

दोन दिवस चालणाऱ्या या संशोधन महोत्सवात शेती; मुलभूत शास्त्रे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान आणि अनुषंगिक विषय, सामाजिक शास्त्रे, मानव्यविज्ञान, वाणिज्य, विधी; आणि आंतरविद्याशाखीय संशोधन अशा सहा वर्गवारीतून एकूण 70 प्रकल्पांचे सादरीकरण केले गेले. या संशोधन स्पर्धेत क्षेत्रनिहाय पूर्व क्षेत्रातून 6, पश्चिम 18, दक्षिण 18, उत्तर 18 आणि मध्य 10 अशा पाच क्षेत्रातून एकूण 70 प्रकल्प प्राप्त झाले होते. सादरीकरणासाठी एकूण 167 विद्यार्थी सहभागी झाले होते.