मुंबई विद्यापीठ वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

सविस्तर माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mu.ac.in वर उपलब्ध करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठ वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुंबई विद्यापीठ (Mumbai University) वेगवेगळ्या पदांकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया (Recruitment process) सुरु झाली आहे. सर्व पदांकरीता अर्ज नमुना, परीक्षा शुल्क, शैक्षणिक पात्रता, अनुभव याची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mu.ac.in वर उपलब्ध करण्यात आली असून  विद्यापीठातर्फे याबाबतची जाहिरात प्रसिद्ध (Advertisement published) करण्यात आली आहे.

https://eduvarta.com/A-course-on-research-and-publication-ethics-will-be-started-in-Pune-University

जाहीरातीमध्ये थिएटर आर्टस् - १ जागा, संगणाकशास्त्र प्राध्यापक - १ जागा, माहिती व तंत्रज्ञान प्राध्यापक १ जागा, माॅनिटरी इकाॅनोमिक्स प्रोफेसर - १ जागा, पाॅलिटिकल इकोनाॅमिक्स प्रोफेसर - १ जागा अशा एकुण पाच वेगवेगळ्या पदांसाठी पाच जागांवर ही भरती राबवली जाणार आहे. वरील सर्व जागा या खुला वर्गातील उमेदवारांसाठी असणार आहेत, असे सांगण्यात आले आहे. 

सदर पदांकरीत ज्या उमेदवारांनी यापु्र्वीच्या जाहिरातीनुसार अर्ज केला आहे, अशा सर्व अर्जदारांना आता नव्याने अर्ज सादर करावा लागणार आहे. मात्र, त्यांना प्रक्रिया शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत २१ मार्चपर्यंत देण्यात आली आहे.