MPSC Exam : स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर; नागरी सेवा पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये

आयोगाकडून दरवर्षी नियोजित वेळापत्रक प्रसिध्द केले जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, यादृष्टीने आयोगाकडून काही महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात येते.

MPSC Exam : स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर; नागरी सेवा पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये
MPSC Timetable

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे (Competitive Examination) अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरि सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Exam) दि. २८ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठीची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिध्द केली जाणार आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत नियोजित आहे.

 

आयोगाकडून दरवर्षी नियोजित वेळापत्रक प्रसिध्द केले जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, यादृष्टीने आयोगाकडून काही महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात येते. त्यानुसार पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये १६ परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षांचा समावेश आहे.

डॉ. संजीव ठाकूर यांची ‘बी.जे.’च्या अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी; उच्च न्यायालयाचा दणका

 

शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल, असे आयोगाकने स्पष्ट केले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो. तसा बदल झाल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे आयोगाने नमूद केले आहे.

 

स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा : https://mpsc.gov.in/downloadFile/english/7952

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO