मृदा व जलसंधारण भरती घोटाळ्यात नाव असलेल्या अधिकार्‍याला सरकारकडून पुरस्कार जाहीर..

मृदा व जलसंधारण भरती परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आजवर दहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून लवकरच मुख्य सूत्रधार पकडण्यात पोलिसांना यश मिळेल असे दिसत आहे. परंतु या प्रकरणातील नक्कल पुरविणारा आरोपी अधिकारी प्रशांत आवंदकर अजूनही पोलिसांना गवसला नाही हे न समजणारे कोडे आहे.

मृदा व जलसंधारण भरती घोटाळ्यात नाव असलेल्या अधिकार्‍याला सरकारकडून पुरस्कार जाहीर..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सरकारच्या मृदा व जलसंधारण विभागाकडून (Soil and Water Conservation Department) उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांना दरवर्षी उत्कृष्ट अभियंता पुरस्कार (Outstanding Engineer Award) जाहीर करण्यात येतात. त्या प्रमाणे यंदा देखील हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये असलेल्या एका नावामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत. कारण यंदा मृदा व जलसंधारण भरती घोटाळ्यात (Soil and Water Conservation Recruitment Scam) नाव असलेल्या उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रशात आवंदकर यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. पेपरफुटी प्रकरणात नाव असलेल्या या अभियंत्याचे नाव उत्कृष्ट अभियंता पुरस्काराच्या यादीत समावेश करण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

शिक्षण सर रागावले, विद्यार्थ्यांची सटकली; शिक्षकाच्या गर्भवती पत्नीची केली निर्घृण हत्या..

मृदा व जलसंधारण भरती परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आजवर दहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून लवकरच मुख्य सूत्रधार पकडण्यात पोलिसांना यश मिळेल असे दिसत आहे. परंतु या प्रकरणातील नक्कल पुरविणारा आरोपी अधिकारी प्रशांत आवंदकर याच्याबद्दल पोलिसांना आजूनही धागेदोरे  सापडला नाहीत हे न समजणारे कोडे आहे. पोलीस दोन्ही बाजू समजून घेऊन योग्य दिशेने तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड यांनी माध्यमांना दिली.
_______________________________________

मृदा आणि जलसंधार भरतीमध्ये विद्यार्थ्यांना हा बोगस सरकारी अभियंता प्रशांत आवंदकर हा चिठ्ठी द्वारे उत्तर पुरवत होता आणि त्या कामानिमीत्त की काय सरकारने त्या बोगस अधिकाऱ्याला पुरस्कार दिला आहे. धन्य आहे देवा भाऊ आपले आणि आपल्या सरकारबद्दल आधी आम्हाला फक्त शंका होती आता खात्री झाली आहे. पेपरफुटी तर थांबवता येत नाही पण जे पेपर फोडतात त्यांना पुरस्कार मात्र देता येतो. आज सिद्ध झालं हे सरकार बोगस आहे आणि बोगस लोकांना पाठिंबा देत आहे.

- स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट राज्य