PHD प्रवेशासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज; पात्र विद्यार्थ्यांच्या 17 नोव्हेंबरपासून मुलाखती सुरू
पहिल्या फेरीत निवड न झालेले पेट परीक्षा पात्र असलेले व पेट परीक्षेमधून सूट मिळालेले पात्र विद्यार्थी दुसऱ्या फेरीमध्ये सहभागी होऊ शकतात. या विद्यार्थ्यांच्या मुलाखती येत्या 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)विविध विभागांमधील व संलग्न महाविद्यालयातील संशोधन केंद्रात उपलब्ध असलेल्या पीएचडी प्रवेशाच्या (phd admission)जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थी 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पीएचडी प्रवेशासाठी आपल्या लॉगिन मधून संशोधन केंद्र (Research Center) निवडू शकतात.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील संशोधन केंद्रामधील उपलब्ध असलेल्या पीएचडी प्रवेशासाठी दुसरी फेरी राबवली जात आहे. पहिल्या फेरीत निवड न झालेले पेट परीक्षा पात्र असलेले व पेट परीक्षेमधून सूट मिळालेले पात्र विद्यार्थी दुसऱ्या फेरीमध्ये सहभागी होऊ शकतात. या विद्यार्थ्यांच्या मुलाखती येत्या 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत काही अडचणी आल्यास संबंधितांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय भवन, पहिला मजला, आय टी सपोर्ट येथील 020- 71 53 36 33 क्रमांकावर संपर्क साधावा.
पीएचडी प्रवेशासाठी प्राध्यापकांकडे उपलब्ध असलेल्या जागांचा आढावा घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठाकडून माहिती संकलित केली जात होती. प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या संशोधन केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या जागेच्या आधारावर पात्र उमेदवारांना पीएचडी प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संशोधन केंद्र निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
eduvarta@gmail.com