अजब प्रकार .. चक्क मृत कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी, मराठवाडा विद्यापीठातील घडना.. 

संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी ३ ते ५ एप्रिल रोजी हजर राहण्याच्या आदेश दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

अजब प्रकार ..  चक्क मृत कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी, मराठवाडा विद्यापीठातील घडना.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगर येथिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील(Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) मृत कर्मचाऱ्यांना चक्क इलेक्शन ड्युटी (Election duty to deceased employees) देण्यात आली आहे. संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी (Sambhajinagar Lok Sabha Election Training) ३ ते ५ एप्रिल रोजी हजर राहण्याच्या आदेशाचे पत्र पाठवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठातील ६३० प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटीचे काम देण्यात आले आहे. त्यामध्ये चार मृत कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. 

मराठवाडा विद्यापाठातील ४ मृत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत. एवढेच नाही तर त्याव्यतिरिक्त विद्यापीठाचे कुलगुरु यांच्यासह प्र-कुलगुरु, कुलसचिव, परीक्षा संचालक, अधिष्ठातांना देखील इलेक्शन ड्युटी देण्यात आली आहे. याचा फटका विद्यापीठाच्या परीक्षांना तर बसणार नाही,  अशी भीती यामुळे व्यक्त केली जात आहे.

विद्यापीठातील ६० कर्मचाऱ्यांची सेवा मागील दोन महिन्यापुर्वी अधिग्रहन केली आहे. विद्यापीठ आणि उपकेंद्रातील १७० प्राध्यापकांसह अधिकारी व कर्मचारी अशा एकूण ५७४ जणांना संभाजीनगर लोकसभा निवडणुक विभागाकडून प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये चक्क चार मृत कर्मचाऱ्यांना देखील हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

विद्यापीठाचे कुलगुरुट डाॅ. विजय फुलारी, प्र-कुलगुरु डाॅ, वाल्मिक सरवदे, चार जिल्ह्याच्या संचालक डाॅ. भारती गवळी, प्रभारी कुलसचिव डाॅ. प्रशांत अमृतकर यांच्यासह महत्त्वाची पद असलेल्या अधिष्ठांनाही निवडणुकीची ड्युटी देण्यात आली आहे. यामुळे विद्यापीठाचा कारभार चालवायचा कोणी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

विद्यापीठाच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना याच कालावधीत निवडणुकांसाठी विद्यापीठ व सलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या सेवा अधिग्रहत झाल्यामुळे त्याचा फटका परीक्षेच्या निकालावर बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कुलगुरु आणि प्र-कुलगुरु यांना तरी किमान या इलेक्शन कामातून वगळण्यात यावे या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांना पाठवण्यात आले आहे.