CTET 2024 परीक्षा अर्ज भरण्याची मुदत सीबीएसईने वाढवली 

इयत्ता 1 ते 8 चे शिक्षक होऊ इच्छिणारे उमेदवार आता CTET जुलैच्या परीक्षेसाठी येत्या 5 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.

CTET 2024 परीक्षा अर्ज भरण्याची मुदत सीबीएसईने वाढवली 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षे (CTET 2024) साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. इयत्ता 1 ते 8 चे शिक्षक होऊ इच्छिणारे उमेदवार आता CTET जुलैच्या परीक्षेसाठी अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन येत्या 5 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.

CTET जुलैची परीक्षा 7 जुलै रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पेपर 2 पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 9.30 ते दुपारी 12 या वेळेत आणि पेपर 1 दुपारच्या शिफ्टमध्ये दुपारी 2 ते 4.30 या वेळेत घेण्यात येईल. CTET पात्रता प्रमाणपत्र सर्व श्रेणींसाठी आजीवन वैध आहे.

CTET स्कोअर केंद्रीय विद्यालय संघटना (KVS), नवोदय विद्यालय समिती (NVS), सेंट्रल तिबेटी शाळा आणि यांसारख्या केंद्र सरकारच्या शाळांना लागू आहेत. या शिवाय नगर हवेली,  केंद्रशासित प्रदेश चंदीगड, दादरा आणि दमण-दीव आणि अंदमान-निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि NCT दिल्लीच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शाळांना हा स्कोर लागू होईल. CTET प्रमाणपत्र विनाअनुदानित खाजगी शाळांना देखील वैध मानले जाते.

ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर 5 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्यासाठी. CTET अर्ज भरताना कोणत्याही तांत्रिक समस्या आल्यास  अर्जदार 8802580447 वर संपर्क साधू शकतात.