कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मदत करणार; रमेश बैस यांची ग्वाही 

या संस्थेच्या समूह विद्यापीठाला शासनाने मंजुरी दिली असून समूह विद्यापीठांना मंजुरी देत असताना शासनाचे जे धोरण होते त्या प्रमाणे आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून उपलब्ध व्हावी, अशी मागणी विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मदत करणार; रमेश बैस यांची ग्वाही 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला (Karmaveer Bhaurao Patil University) आवश्यक असणाऱ्या मदतीसाठी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्या प्रस्तावाची प्रत राज्यपाल कार्यालयास पाठविण्यात यावी. शासनाकडून निधी उपलब्धतेसाठी आवश्यक (Necessary funds will be made available) ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी महावळेश्वर येथे घेतलेल्या आढावा बैठकीत (Mahabaleshwar review meeting) दिली.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कामकाज, अडीअडचणी याबाबत महाबळेश्वर येथे राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. रयत शिक्षण संस्था ही देशातील अत्यंत जुनी व मोठी शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत जवळपास साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेच्या समूह विद्यापीठाला शासनाने मंजुरी दिली असून समूह विद्यापीठांना मंजुरी देत असताना शासनाचे जे धोरण होते. त्या प्रमाणे आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून उपलब्ध व्हावी, अशी मागणी विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला आवश्यक मदतीसाठी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात यावा. शासनाकडून निधी उपलब्धतेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी दिली.

या आढावा बैठकीत त्यांनी विद्यापीठामार्फत चालविण्यात येत असणाऱ्या करिअर ओरिएंटेड उपक्रम, स्किल ओरिएंटेड उपक्रम, त्यातून विद्यार्थ्यांना निर्माण होत असलेला रोजगार, नोकऱ्या यांचाही आढावा घेतला. रयत शिक्षण संस्थेमार्फत बेळगाव मध्ये चालविण्यात येत असणाऱ्या शाळांबद्दलही राज्यपाल बैस यांनी जाणून घेतले. यावेळी राज्यपाल यांचे सहसचिव श्वेता सिंघल, विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी, कुलगुरु डी.टी. शिर्के, कुल सचिव डॉ. विजय कुंभार, उपसचिव रविंद्र धुरजड आदी उपस्थित होते.