राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू 

पुरस्कार देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठे, उच्च शैक्षणिक संस्था/पॉलिटेक्निकमधील सर्व प्राध्यापकांसाठी आहे. 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Teacher Award)(उच्च शिक्षण) 2024 साठी अर्ज प्रक्रिया (Application process)सुरू केली आहे. अधिसूचनेनुसार हा पुरस्कार देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठे, उच्च शैक्षणिक संस्था/पॉलिटेक्निकमधील सर्व प्राध्यापकांसाठी (For all professors)आहे. 

पदक आणि प्रमाणपत्रासह 50,000 रुपयांचे रोख बक्षीस पुरस्काराचे स्वरूप आहे.  उमेदवार अधिकृत वेबसाइट awards.gov.in वर जाऊन नोंदणीसह इतर माहिती डाउनलोड करू शकतात.

नोंदणी करणारी व्यक्ती नियमित विद्याशाखेची सदस्य असणे आवश्यक आहे. तसेच पदवी/किंवा पदव्युत्तर स्तरावर किमान पाच वर्षांचा पूर्णवेळ अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे. पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवाराचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

कुलगुरू/संचालक/प्राचार्य (नियमित किंवा कार्यवाहक) अर्ज करण्यास पात्र नाहीत.मात्र, ज्या व्यक्तींनी यापूर्वी अशी पदे भूषवली आहेत. परंतु वय ​​55 वर्षांपेक्षा कमी आहे आणि अद्याप सक्रिय सेवेत आहेत. ते अर्ज करण्यास पात्र आहेत.