राज्यभर आंदोलन पेटवणार, तारीख जाहीर! रोहित पवारांकडून सरकारला पुन्हा अल्टिमेटम

मागील काही दिवसांपासून पदभरती, कंत्राटी भरतीशी संबंधित विविध मुद्दयांवर रोहित पवार सरकारला धारेवर धरत आहे. शिक्षक भरतीसाठी मंत्रालयासमोर उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला होता.

राज्यभर आंदोलन पेटवणार, तारीख जाहीर! रोहित पवारांकडून सरकारला पुन्हा अल्टिमेटम
MLA Rohit Pawar Hunger Strike

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

कंत्राटी भरतीसह (Contractual Recruitment) स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार, दत्तक शाळा योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी बुधवारी पुण्यात महात्मा फुले वाडा येथे लाक्षणिक उपोषण (Hunger Strike) केले. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारला २० दिवसांचा अल्टीमेटम देत राज्यभर आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी व युवकांच्या मदतीने येत्या १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान उपोषण करण्याचा इशार पवार यांनी दिला.

 

मागील काही दिवसांपासून पदभरती, कंत्राटी भरतीशी संबंधित विविध मुद्दयांवर रोहित पवार सरकारला धारेवर धरत आहे. शिक्षक भरतीसाठी मंत्रालयासमोर उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला होता. पण त्यापुर्वीच भरती प्रक्रिया सुरू झाली. आता पुन्हा त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. भाजपकडून आपल्याला ट्रोल केले जात असल्याचे सांगत पवार यांनी विद्यार्थ्यांसाठी उपोषण करणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले होते. त्यावेळी त्यांनी आपण महाराष्ट्र पेटवत असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे, असे म्हटले होते. तसेच होय मी पेटवतोय महाराष्ट्र, असे म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले होते.

'कमवा व शिका' मानधन वाढीसाठी अधिसभा सदस्याचे उपोषण; व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयाकडे लक्ष

 

बुधवारी लाक्षणिक उपोषणानंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी सरकारला पुन्हा अल्टीमेटम देत आता राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, अराजकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आम्ही प्रातिनिधिक उपोषण केले. प्रस्थापितांविरोधात सामान्य लोकांसाठी जिथून लढा उभा राहिला तिथे उपोषण केले. कंत्राटी भरतीच्याविरोधात आम्ही उपोषण केले. सुमारे ७५ हजार जणांना कंत्राटी भरतीद्वारे घेतले जाणार आहे. यामध्ये कंत्राटदार मोठा होणार आहे.

 

तलाठीसह इतर भरतीसाठी हजार रुपये बंद करून ते विद्यार्थ्यांना परत द्यावेत. सरकारची फी भरण्यासाठी एका-एकाने १० ते १५ हजार रुपये भरले आहेत. ते पैसे त्यांना परत मिळायला हवेत. तलाठी भरतीसाठी एका पदाला १५ ते २५ लाख रुपये घेतले गेले. अशाप्रकारे पेपरफुटी होत असेल तर राजस्थानच्या धर्तीवर कायदा करावा. तलाठी भरतीत अनियमिता झाली असेल तर एका समितीच्या माध्यमातून चौकशी करावी, या मागण्यांसाठी आम्ही उपोषण केल्याचे पवार यांनी सांगितले.

 

शाळांना दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता शाळा दत्तक दिली जाईल, नंतर शाळेलगतची जमीनही कंपन्यांना पीपीपी तत्वावर दिली जाईल. एक लाख कोटीचे कर्ज शाळा बांधण्यासाठी घ्या. मुलांना वसतिगृह बांधण्यासाठी पैसे खर्च करावेत. जाहिरात बाजी कमी करून युवकांच्या भवितव्यासाठी खर्च करावेत. याबाबतीत राजकारण करू नये. आज फक्त प्रातिनिधिक स्वरुपात उपोषण करत आहोत. तर १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उपोषण केले जाईल, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j