पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १५ जून २०२४ पर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 

पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सरकारने कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण (Post Graduate Education in Branch) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये (Directorate General of Information and Public Relations) इंटर्नशिप करण्याची संधी (State Govt Internship Opportunity) उपलब्ध करुन दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १५ जून २०२४ पर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार (Application can be made through offline mode) आहे. 

इंटरशिप करण्याचा कालावधी 3 महिन्यांचा असेल. विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन, प्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्थेची सुविधा मिळणार नसून सर्व स्वखर्चाने करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या पात्रता कौशल्यानुसार मुद्रित माध्यम, दृकश्राव्य, सोशल मीडिया, प्रकाशने, व्हिडीओ एडिटिंग, तंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी विविध शाखांमध्ये काम दिले जाणार आहे. 

मानधन जरी मिळणार नसले तरी, महासंचालनालयाद्वारे शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना मुद्रित, दृकश्राव्य, वेब, समाज माध्यम अशा विविध माध्यमांतून प्रसिद्धी दिली जाते. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. यशस्वीरित्या इंटरशिप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

असे करता येणार अर्ज 

इच्छुकांनी संशोधन अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, १७ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२ येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा. अर्जासोबत वैयक्तिक माहिती, नमुन्यातील माहिती, पदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असल्यास अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावी. पाकिटावर इंटर्नशिपसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२४ आहे. अर्जाच्या नमुन्यासाठी महसंचालनालयाच्या महासंवाद या पोर्टलवर https://mahasamvad.in/?p=127837  जाहिरात पहावी.