D.Ed Admission : डीएड प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ; सोमवारपासून ऑनलाईन अर्ज करता येणार

प्रवेशाबाबतची सर्व माहिती https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

D.Ed Admission : डीएड प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ; सोमवारपासून  ऑनलाईन अर्ज करता येणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर (SCERT) डी.एल.एड प्रथम वर्ष (First Year D.L.Ed)(डीएड D.Ed) प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिध्द (Admission time table announced) करण्यात आले आहे.विद्यार्थी येत्या सोमवारपासून (दि.3 जून) डीएड  अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. शासकीय व व्यावसायिक कोट्यासाठी (Government and commercial quotas)स्वतंत्र वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले असून एसईआरटीच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रकासह प्रवेशाची नियमावली उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार डीएलएड अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा,असे आवाहन राज्यस्तरीय डीएलएड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल रेखाराव (Rahul Rekharao)यांनी केले आहे. 

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून गुणपत्रिका मिळताच विद्यार्थी विविध अभ्यासक्रम प्रवेश घेतात. काही विद्यार्थी बारावीनंतर डीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेतात,अशा विद्यार्थ्यांना 3 जून ते 18 जून या कालावधीत डीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. DIET स्तरावर पूर्ण भरलेल्या अर्जाची ऑनलाईन  पडताळणी 3 ते 19 जून या कालावधीत केली जाणार असून 26 जून रोजी गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रवेशाबाबतची सर्व माहिती https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

डीएड प्रवेशाची पहिल्या फेरीची यादी 27 जून रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना 27 जून ते 1 जुलै या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी 2 जुलै विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे विकल्प भरता येणार असून पूर्वी भरलेले विकल्प बदलता येणार आहेत. 4 जुलै रोजी प्रवेशाची दुसरी यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या 4 जुलै ते 8 जुलै या कालावधीत प्रवेश घेता येतील. प्रवेशाची तिसरी फेरी 11 जुलै रोजी सुरू होईल. तर 15 जुलैपासून प्रथम वर्षांचे प्रवेश सुरू होतील.