SPPU: पीएचडी प्रवेशासाठी केंद्र निवडीचा शेवटचा दिवस 

काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संशोधन केंद्र निवडले नसल्यामुळे त्यांच्याकडून मुदत वाढीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करून 14 नोव्हेंबर पर्यंत संशोधन केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास मदतवाढ देण्यात आली.

SPPU: पीएचडी प्रवेशासाठी केंद्र निवडीचा शेवटचा दिवस 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे(Savitribai Phule Pune University)पीएचडी प्रवेशासाठी (phd admission)राबविल्या जात असलेल्या दुसऱ्या फेरी अंतर्गत पीएचडी प्रवेशासाठी केंद्र (Center for PhD Admissions) निवडीसाठी 10 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु,ही मदत आता 14 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आले असून केंद्र निवडीचा आज शेवटचा दिवस आहे.

विद्यापीठाच्या विविध विभागांमधील तसेच संलग्न महाविद्यालयातील संशोधन केंद्रातील पीएचडी प्रवेशाच्या जागांसाठी दुसरी फेरी राबवली जात आहे. पहिल्या फेरीत निवड न झालेले पेट परीक्षा पात्र व पेट परीक्षेतून सूट मिळालेले विद्यार्थी या फेरीसाठी मुलाखतीस पात्र ठरणार आहेत. या विद्यार्थ्यांची मुलाखत 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान घेतली जाणार आहे. काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संशोधन केंद्र निवडले नसल्यामुळे त्यांच्याकडून मुदत वाढीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करून 14 नोव्हेंबर पर्यंत संशोधन केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास मदतवाढ देण्यात आली. 14 नोव्हेंबरनंतर या फेरीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही,याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.मुंजाजी रासवे यांनी केले आहे.