कुणाच्या मामी, कुणाच्या मेहुणीसाठी पदाचा गैरवापर;अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी
विद्यापीठातील अधिकारी हे आपआपल्या नातेवाईकांना म्हणजेच कुणाची बायको, कुणाचे नवरे, कुणाची मेहुणी,कुणाची भाची, कुणाची मामी, कुणाची मूलगी,मुलगा यांना विद्यापीठात घेण्यासाठी पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील(Savitribai Phule Pune University)विधी विभागात (Law Department)अपात्र उमेदवारांची अतिथी प्राध्यापक म्हणून नियुक्ती केले असल्याची लेखी तक्रार विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे (vice chancellor)करण्यात आली असून याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांचा राजीनामा घ्यावा,अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने (vidyaapeeth vidtarthee sangharsh krutee samitee)केली आहे.तसेच विद्यापीठातील अधिकारी हे आपआपल्या नातेवाईकांना म्हणजेच कुणाची बायको, कुणाचे नवरे, कुणाची मेहुणी,कुणाची भाची, कुणाची मामी, कुणाची मूलगी,मुलगा यांना विद्यापीठात घेण्यासाठी पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केला आहे.
विद्यापीठाच्या विधी विभागात अपात्र व्यक्तीची नियुक्ती काशी केली, अशी विचारना विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ.ज्योती भाकरे यांच्याकडे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे करण्यात आली होती.त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने समितीतर्फे मंगळवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे विधी विभागाचे प्रमुख व प्रभारी कुलसचिव यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.तसेच त्यावर योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन केले जाईल,असा इशारा देण्यात आला.
अपात्र व्यक्तीची विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणून नियुक्ती कशी? थेट कुलसचिवांनाच केली विचारना
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागात अतिथी प्राध्यापक म्हणून एका अपात्र व्यक्तींची निवड करण्यात आली असून प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक सेट नेट तसेच पीएच.डी यांमधील एकही पात्रता परीक्षा/ पदवी नसताना प्रभारी कुलसचिव व विभाग प्रमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत चुकीची नियुक्ती केली आहे. हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. दलित,बहुजन,शेतकरी कष्टकरी,कामगारांची मुलं सेट-नेट, पीएच.डी होऊन संघर्ष करत आहेत तर विद्यापीठातील अधिकारी आपापल्या नातेवाईकांना म्हणजे कुणाची बायको, कुणाचे नवरे, कुणीची मेव्हणी, कुणाची भाची, कुणाची मामी, कुणाची मुलगी/ मुलगा इ. घेण्यासाठी पदांचा वापर करत आहेत. संबंधित अपात्र व्यक्तीला आमचा वैयक्तिक विरोध नाही. परंतु,या अधिकाऱ्यांना विरोध आहे. आपण संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रभारी कुलसचिव आणि विभाग प्रमुखांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा आम्हाला विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल,असा इशारा निवेदनाद्वारे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने अध्यक्ष राहुल ससाणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
दरम्यान, याबाबत विद्यापीठाच्या विधी विभागाच्या प्रमुखांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

eduvarta@gmail.com