अपात्र व्यक्तीची विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणून नियुक्ती कशी? थेट कुलसचिवांनाच केली विचारना
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
प्राध्यापक नियुक्तीबाबत राज्य शासनाकडून वादग्रस्त नियमावली तयार केल्याचा निषेध केला जात आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या(Savitribai Phule Pune University)विधी विभागात अतिथी प्राध्यापक (Guest Professor in the Department of Law)म्हणून नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली असल्याचा दावा विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या (vidyaapeeth vidtarthee sangharsh krutee samitee)वतीने थेट विद्यापीठाच्या कुलसचिवांसमोर (registrar)करण्यात आला.तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.त्यामुळे विद्यापीठाला पात्र प्राध्यापक मिळत नाहीत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे (In-charge Registrar Dr. Jyoti Bhakare)यांच्याशी विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.त्यात नवीन कायमस्वरूपी १११ प्राध्यापक पदभरती मध्ये लावण्यात आलेला ७५ / २५ चा नियम रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.तसेच १८ जून २०२५ रोजी कंत्राटी पद भरतीसाठी पहिली १३३ पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली. २ ऑगस्टला निकाल जाहीर झाला यामध्ये फक्त ६७ उमेदवार घेतले गेले. यावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर पुन्हा दुसरी ५२ जाहिरात ३ सप्टेंबर २०२५ रोजी काढण्यात आली. याचा निकाल नोव्हेंबर २०२५ ला लागला,यामध्ये पुन्हा घोळ करत फक्त २१ उमेदवार निवडले गेले. ११ महिन्याच्या कंत्राटी निवडीसाठी ६ ते ७ महिने प्रकिया चालते. हे खूपच धक्कादायक आहे. यावर प्रश्न विचारण्यात आले.तसेच विद्यापीठाच्या विधी विभागात अपात्र व्यक्ती अतिथी प्राध्यापक म्हणून कसा नियुक्त करण्यात आला, यावरही सवाल उपस्थित केला. त्यावर कुलसचिव म्हणाल्या की कंत्राटी व पूर्णवेळ प्राध्यापक पडंसंदर्भातील काम कुलसचिव कार्यालयातर्फे केले जाते. अतिथी प्राध्यापक नियुक्तीचा निर्णय विभाग प्रमुख स्थरावर घेतला जातो.तो व्यक्ती पात्र आहे किंवा नाही हे विभाग प्रमुख यांच्याकडून पाहिले जाते.त्यामुळे विभाग प्रमुखांनी कोणाची नियुक्ती केली याबाबत कल्पना नाही.
अधिष्ठाता निवडीमधील जाहिरात व त्यामधील गोंधळ , sc,st, OBC cell ची स्थापना व अंमलबजावणी, महापुरुषांच्या पुतळ्या परिसरातील उद्यानांची स्वच्छता तात्काळ करण्यात यावी. तसेच नवीन निविदा काढून परिसराची स्वच्छता करावी. पीएच. डी प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी पारदर्शक व्हावी, भोजनगृह व उपहारगृह दक्षता समितीच्या अध्यक्षांची हकालपट्टी करण्यात यावी, तसेच इस्टेट विभागांतील भ्रष्ट कार्यकारी अभियंत्यांची हकालपट्टी करण्यात यावी, आदी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन प्रभारी कुलसचिव यांनी दिले असल्याचे यावेळी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे यांनी सांगितले. या प्रसंगी समितीचे सदस्य रोहित भामरे, मयुर जावळे, समाधान दुपारगुडे, अभिषेक शेलकर, वकील अक्षय दहिफळे तसेच विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
eduvarta@gmail.com