प्रशासकीय मूल्यांकनात गोंडवाना विद्यापीठ प्रथम; पुणे विद्यापीठाची घसरण, सर्वात कमी गुण

गोंडवाना विद्यापीठाला सर्वाधिक 68 तर मुंबई व शिवाजी विद्यापीठाला प्रत्येकी 66 गुण मिळाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्वात कमी 42 गुण मिळाले.

प्रशासकीय मूल्यांकनात गोंडवाना विद्यापीठ प्रथम; पुणे विद्यापीठाची घसरण, सर्वात कमी गुण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत (Department of Higher and Technical Education)येणाऱ्या 13 सार्वजनिक कृषी विद्यापीठांचे सेवा कर्मी कार्यक्रमांतर्गत एकप्रकारे प्रशासकीय मूल्यांकन (Administrative assessment)करण्यात आले.त्यात गोंडवाना विद्यापीठ (Gondwana University)प्रथम क्रमांकावर मुंबई विद्यापीठ द्वितीय क्रमांक वर तर शिवाजी विद्यापीठ (Shivaji University)तृतीय क्रमांकावर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला (Savitribai Phule Pune University) सर्व विद्यापीठांच्या तुलनेत १०० पैकी सर्वात कमी ४२ गुण मिळाले आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आता पुणे विद्यापीठाची प्रशासकीय गुणवत्ता सुद्धा ढासळली असल्याचे दिसून येत आहे. 

उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे सर्व विद्यापीठांना आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम, सर्व संवर्गाची अद्ययावत ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करणे, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती, सरळ सेवा नियुक्ती रिक्त परिस्थिती, बिंदूनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, iGOT पोर्टलवर रजिस्ट्रेशन व पाच कोर्स पूर्ण करणे यासह सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अध्ययवाद करणे व डिजिटल करणे या कामांसाठी एकूण 100 गुण देण्यात आले. त्यात गोंडवाना विद्यापीठाला सर्वाधिक 68 तर मुंबई व शिवाजी विद्यापीठाला प्रत्येकी 66 गुण मिळाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्वात कमी 42 गुण मिळाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अध्ययवत करणे व डिजिटल करणे या घटकासाठी शून्य गुण मिळाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकांचे अद्ययावतीकारण आणि डिजिटलायझेशन केले नसल्याचे स्पष्ट होते. मुंबई ,कोल्हापूर, गोंडवाना, अमरावती विद्यापीठाला यासाठी 20 पैकी 20 गुण मिळाले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एन आय आर एफ रँकिंग मध्ये घसरण झाल्यानंतर घसरण झाल्याचे पाहायला मिळाले त्यानंतर आता राज्य शासनाने केलेल्या गुणांकनामध्ये सुद्धा विद्यापीठ शेवटच्या स्थानी असल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठामध्ये असणारे अपुरे मनुष्यबळ हे सुद्धा त्याचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे केवळ प्राध्यापक नाही तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा विद्यापीठाला करावी लागणार आहे.

सर्व विद्यापीठांना मिळालेल्या एकूण गुणांची स्थिती खालील प्रमाणे