CET Cell : आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राबविण्यात येणाऱ्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेकरीता (कॅप) EWS संवर्गातून प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती पुस्तिका तसेच महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णयामध्ये नमुद परीशिष्ट अ नमुन्यात आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र सादर करणे बंधणकारक राहील.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सीईटी सेलने आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी (Candidates from economically weaker sections) महत्त्वाची सूचना प्रसिद्ध (Important notice published) केली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राबविण्यात येणाऱ्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेकरीता (कॅप) EWS संवर्गातून प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती पुस्तिका तसेच महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णयामध्ये नमुद परीशिष्ट 'अ' नमुन्यात आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र सादर करणे बंधणकारक राहील. जे उमेदवार सदर प्रमाणपत्राऐवजी इतर कोणत्याही नमुन्यातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र सादर करतील अशा उमेदवारांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही,याची सर्व उमेदवार/पालक/संस्थांनी नोंद घ्यावी, असे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेमध्ये म्हटले आहे.
संसदेने संविधानात १०३ व्या घटनादुरुस्तीनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये १० टक्के आरक्षण विहित केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळाच्या मान्यतेने अराखीव उमेदवारांकरीता (खुला प्रवर्ग) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण लागू केले आहे. सदर आरक्षणाच्या लाभासाठी ज्या घटकांना राज्यात कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ दिला जात नाही, अशा अराखीव उमेदवारांचा (खुला प्रवर्ग) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये राज्यात सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गास महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे) आरक्षण अधिनियम तरतूदींन्वये आरक्षण असल्याने राज्यात एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या लाभासाठी अनुज्ञेय नाहीत.
ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या लाभाबाबतचे केंद्र व राज्य शासनाचे निकष हे वेगवेगळे असल्याने केंद्र शासनाच्या सेवा व प्रवेश यामध्ये एसईबीसी उमेदवार हा केंद्र शासनाच्या निकषाच्या पूर्तता करुन ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभास पात्र असल्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच राज्य शासनाच्या सेवा व प्रवेशात एसईबीसी उमेदवारास ईडब्ल्यूएस लाभाबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
eduvarta@gmail.com